Monday, February 06, 2012

पायांचे छाले.. (उधारीचं हसू आणून....)

१२.

पळवून पळवून काळाने
पुरती दमछाक केली
पायांना पडलेल्या छाल्यांकडे
मीही डोळेझाक केली

आज कळतंय, वेडेपणा होता
तुझ्यापासून दूर जातोय,
हा विचारच चुकीचा होता

कारण तू नेहमीच क्षितीज होतीस
जवळ असूनही दूरच होतीस
मी वेड्यासारखा पळतोय
क्षितिजापासून दूर जाण्यासाठी
आणि तू तिथेच आहेस,
मला फक्त खुणावण्यासाठी

उशीरा का होईना पण मला शहाणपण सुचलंय
फार दूरचं न पाहायचं आज मी ठरवलंय
रोज नवा सूर्य पोटात जाईल,
रोज नवा बाहेर येईल..
पण मी क्षितिजाकडे न बघता आकाशालाच बघीन
स्वत:च्या नजरेत पडलोय, तरी मान वर करीन

माझ्याच वेदनेला छळीन खोटं खोटं नाकारून
पायाच्या छाल्यांकडे बघीन,
उधारीचं हसू आणून....

....रसप....
५ फेब्रुवारी २०१२

उधारीचं हसू आणून.... (सर्व कविता)

1 comment:

  1. रोज नवा सूर्य पोटात जाईल,
    रोज नवा बाहेर येईल..

    बाबारे, काय कल्पना आहे! (पचवायला कठीण आहे:-) कुर्निसात!!
    - श्रीधर जहागिरदार

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...