Tuesday, May 31, 2011

प्रेमवरुणा.. (पद)


प्रेमवरुणा बरस मजवरी
मम तृषा दाटली अधरी

दरवळेल मृदा तव अमृते
डवरवेल हे सुमन-ताटवे
ऐक ना, तुज गूज सांगते बावरी

प्रेमवरुणा बरस मजवरी..


....रसप....
३१ मे २०११


"मराठी कविता समुहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत" ह्या उपक्रमासाठी एक पद लिहायचा प्रयत्न केला आहे.

Monday, May 30, 2011

ना कुणी ऐकायलाही....



ना कुणी ऐकायलाही मी फुका रडणे कशाला?
पेटला काळोख ज्योतीने तिथे जळणे कशाला?

हात द्यावा सागराने अंबराला विद्ध होता
आसवांच्या उष्णडोही भावना बुडणे कशाला?

श्वास माझे मोजुनी मी वेळ माझा घालवीतो
मोजदादीला कुणी ह्या मागुनी करणे कशाला?

स्वस्त झाली वेदना लिंपून सोनेरी सुखांना
मी किती चैनीत आहे जाणुनी हसणे कशाला?

भक्त आहे कोणता येथे खरा नाही कुणीही
निर्मिले तू विश्व आता 'आपले' म्हणणे कशाला?

सोबतीची आस येथे ठेवणेही फोल 'जीतू'
तू खुणांनी पावलांच्या वाट ही भरणे कशाला?


....रसप....
३० मे २०११

.
"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल - भाग ४" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली गझल.
.

Saturday, May 28, 2011

मनात त्यांच्या प्रेम दाटले.... (जंगल दूत -३)

इथे लांडगा ऐकत होता
वाघाच्या त्या डरकाळ्यांना
लांडगीणही समजून होती
शिकारीस तो मुकला होता

"मूर्ख लंगडा शेरखान हा
कशास आला जंगलात ह्या?
इथे न चाले त्याची सत्ता
ठाव नसे का त्याचे त्याला?

हाकून देऊ इथून त्यासी"
गुरगुरली ती लांडगीणही
कुशीत अपुल्या पिलावळीला
घेऊन त्यांना चाटत होती..

तोच तयांना चाहूल आली
झाडीमधुनी येई कोणी
रोखून होते श्वास आपले
पाहु लागले दबा धरूनी

खुरडत आले लहानगे ते
खरचटलेले, जखमी होते
उभे राहिले तरी न डरता
गोड निरागस हासत होते

लांडग्यांसही नवल वाटले
किती लाघवी अन् सानुले
पोर माणसाचे ते पाहुन
मनात त्यांच्या प्रेम दाटले....



....रसप....
२८ मे २०११
(क्रमश:)



.

Thursday, May 26, 2011

वैनगंगेच्या तीरावरती.. ("जंगल दूत"- २)




वैनगंगेच्या तीरावरती
छोटी छोटी गावं होती
जंगल होते अवतीभवती
हिंस्त्र श्वापदे तिथे राहती

सर्व माणसे गरीब साधी
शेती करती, गुरे पाळती
लाकुडतोडे होते काही
सुखे आपले जीवन जगती

एके दिवशी अद्भुत घडले
असे न कोणी कधी कल्पिले
"शेरखान" वाघाने तेथे
शिकार करण्या लक्ष वळविले!

एका लाकुडतोड्याचे ते
लहानगेसे पोर होते
वाघाच्या हल्ल्याला चुकवुन
जंगलामध्येच गेले होते..

'शेरखान' तो वाघ लंगडा
शिकार हुकता क्रोधित झाला
शोधत शोधत त्या पोराला
डरकाळ्या तो देऊ लागला!

पोर छोटे निर्भय होते
झाडीमधुनी धावत होते
चढून गेले टेकाडावर
तिथे लांडग्याचे घर होते.......


....रसप....
२६ मे २०११


क्रमश:


"जंगल दूत - १"
.

Wednesday, May 25, 2011

रत्न माणके कुठे सांडली?

रत्न माणके कुठे सांडली तुझे हासणे अजून बाकी
जीव घेतसे मुकी शांतता तुझे बोलणे अजून बाकी

ऐक साजणी तुला सांगतो मला भेटली तुझीच स्वप्ने
खिन्न जाहली, सुनी वाटली.. तुझे पाहणे अजून बाकी!

फूलपाखरू जसे कोवळे तशी नाजुका खरीच तूही
बाग बोलतो, "अरे पाखरा तुझे खेळणे अजून बाकी!"

काल पाहुनी तुला भाळला पहा अंबरी अबोल तारा
चंद्र थांबला सडा शिंपुनी तुझे वेचणे अजून बाकी

जाणतो सखे तुझी वेदना जसे बोचती गुलाबकाटे
लोचनातल्या महासागरा तुझे प्राशणे अजून बाकी


....रसप....
२५ मे २०११


(गालगालगा लगागालगा लगागालगा लगालगागा)     

"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल - भाग ३" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली गझल.

.

जंगल दूत

१.  

जंगल जंगल बात चली है - भावानुवाद

सा-या जंगलामध्ये पसरली एक बातमी
खुद्कन् हसलंय फूल लाघवी, फूल लाघवी
....................... सा-या जंगलामध्ये बातमी, खुद्कन् हसलंय फूल लाघवी
....................... सा-या जंगलामध्ये बातमी, खुद्कन् हसलंय फूल लाघवी


एक पाखरू बुजलं होतं,
लाजत होतंssss
अरे अंड्यामधेच सुखात होतो,
बोलत होतंsssss
कशास आलो आहे येथे जन्म घेऊनी

खुद्कन् हसलंय फूल लाघवी, फूल लाघवी

....................... सा-या जंगलामध्ये बातमी, खुद्कन् हसलंय फूल लाघवी
....................... सा-या जंगलामध्ये बातमी, खुद्कन् हसलंय फूल लाघवी


-
मूळ गीत - जंगल जंगल बात चली हैं...
मूळ कवी - गुलजार
भावानुवाद - ....रसप....
२५ मे २०११



मूळ गीत -


जंगल जंगल बात चली है… पता चला है..
अरे चड्डी पहन के फूल खिला है ..फूल खिला है

....................... जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है
....................... जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है

एक परिंदा है शर्मिंदा..
था वो नंगाssss
भाई इससे तो अंडे के अन्दर…
था वो  चंगाssss
सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है…

अरे चड्डी पहन के फूल खिला है ..फूल खिला है

....................... जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है
....................... जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है

- गुलजार

.

२.

वैनगंगेच्या तीरावरती
छोटी छोटी गावं होती
जंगल होते अवतीभवती
हिंस्त्र श्वापदे तिथे राहती

सर्व माणसे गरीब साधी
शेती करती, गुरे पाळती
लाकुडतोडे होते काही
सुखे आपले जीवन जगती

एके दिवशी अद्भुत घडले
असे न कोणी कधी कल्पिले
"शेरखान" वाघाने तेथे
शिकार करण्या लक्ष वळविले!

एका लाकुडतोड्याचे ते
लहानगेसे पोर होते
वाघाच्या हल्ल्याला चुकवुन
जंगलामध्येच गेले होते..

'शेरखान' तो वाघ लंगडा
शिकार हुकता क्रोधित झाला
शोधत शोधत त्या पोराला
डरकाळ्या तो देऊ लागला!

पोर छोटे निर्भय होते
झाडीमधुनी धावत होते
चढून गेले टेकाडावर
तिथे लांडग्याचे घर होते.......


....रसप....
२६ मे २०११
.
.

३.


इथे लांडगा ऐकत होता
वाघाच्या त्या डरकाळ्यांना
लांडगीणही समजून होती
शिकारीस तो मुकला होता

"मूर्ख लंगडा शेरखान हा
कशास आला जंगलात ह्या?
इथे न चाले त्याची सत्ता
ठाव नसे का त्याचे त्याला?

हाकून देऊ इथून त्यासी"
गुरगुरली ती लांडगीणही
कुशीत अपुल्या पिलावळीला
घेऊन त्यांना चाटत होती..

तोच तयांना चाहूल आली
झाडीमधुनी येई कोणी
रोखून होते श्वास आपले
पाहु लागले दबा धरूनी

खुरडत आले लहानगे ते
खरचटलेले, जखमी होते
उभे राहिले तरी न डरता
गोड निरागस हासत होते

लांडग्यांसही नवल वाटले
किती लाघवी अन् सानुले
पोर माणसाचे ते पाहुन
मनात त्यांच्या प्रेम दाटले....



....रसप....
२८ मे २०११


४. 

लबाड कोल्हा नाव "तबाकी"
शेरखानच्या मागे-पुढती
चमचा त्याचा पक्का कपटी
जगतो उष्ट्या तुकड्यांवरती

खोड्या करणे, काड्या करणे
तंटा लावून मजा पहाणे
कुणी न ह्याला मित्र मानती
आपल्यापासून दूर ठेवती

तबाकी इथे जुना-पुराणा
कानाकोपरा ठाऊक त्याला
हेच जाणले शेरखानने
म्हणून संगती घेई त्याला

जंगलाच्या ह्या भागावरती
शेरखानची सत्ता नव्हती
नदीपारच्या जंगलामध्ये
पूर्वी त्याची हुकमत होती

लंगड्याचे ह्या कुणी न ऐके
शिकार ह्याचे पंजे चुकवे
म्हणून गेला माणसामागे
तरी मिळाले ह्याला चकवे!

डिवचलेला अन् चिडलेला
टेकाडावर वाघ पोचला
मागुन होता तबाकी कोल्हा
डरकाळ्यांचा नाद गुंजला..!!

"शिकार माझी परत करा
तुम्हांस सांगतो ऐका जरा
उडेल तुमची दाणादाण
वाघ दांडगा मी शेरखान!!"

....रसप....
२२ जून २०११

Tuesday, May 24, 2011

आठवांचे थवे


तू गेलीस..
जाणार.. माहित होतं पण तरी -
मनातलं आभाळ निरभ्र झालं..
स्वच्छ.. फटफटीत झालं
आणि कुठल्याश्या कोप-यातून त्या रखरखीत आभाळाच्या
मला अलगद उचलून घेऊन जाण्यासाठी
रंगीबेरंगी आठवांचे धावून आले थवे
त्यांनी हात पुढे करण्याआधीच,
मी स्वत:च उडू लागलो त्यांच्या सवे
त्या पाखरांनी मला दाखवलं बरंच काही
जे मी कधी पाहिलंच नव्हतं
पाहूनही समजलंच नव्हतं

मी पाहिल्या तुझ्या कळा
मरणाच्या वेदना.. माझ्या जन्मासाठी
मी जागवलेल्या कित्येक राती
आणि तरीही तुझ्या प्रेमाला
आलेली अमर्याद भरती...

माझा पहिला शब्द... माझं पहिलं पाऊल
आणि तुझ्या भरल्या डोळ्यांमध्ये
माझ्या भविष्याची चाहूल
फुटलेलं ढोपर घेऊन माझं कळवळणं
झोंबणारं औषध लावताना तूसुद्धा रडणं
शाळेत मस्ती केली म्हणून मला शिक्षा केलीस
माझ्याबरोबर तूसुद्धा कशी उपाशी राहिलीस

नंतर जगासाठी मी मोठा झालो
पण तुझ्यासाठी मात्र नेहमी
तुझा सानुलाच राहिलो..
तू पाहिलेल्या स्वप्नांना मातीमोल केलं
तुझ्या सगळ्या अपेक्षांना अगदी फोल केलं
तरीसुद्धा माझ्यापाठी खंबीर उभी राहिलीस
माझ्या छोट्या छोट्या यशामध्ये धन्यता मानलीस

आज तू गेलीस..
जाणार. माहित होतं
तरी मनातलं आभाळ निरभ्र झालं..
त्या रखरखीत आभाळात आता उडताहेत आठवांचे थवे
मीही भरकटलोय उडता उडता त्यांच्या सवे...

.... रसप....
२५ मे २०११


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली कविता

आठवे

आठवांचे धावुनी आले थवे
घेउनी गेले मला त्यांच्या सवे

आठवांच्या भोवताली वर्तुळे
स्वप्रकाशी उजळती हे काजवे

आठवांना लोचनांनी माळले
पापण्यांनी प्यायली का आसवे?

आठवांची पावले ना वाजली
हासले बागेमधूनी ताटवे..!

आठवांनी सोडल्या येथे खुणा
वेदना ही का मनाला गोठवे?

आठवांनो गीत माझे गाल का?
की सुरांना शब्द आता जोजवे?

आठवांचा मांडला बाजार मी
भावनांना तोलण्याला ताजवे...!


....रसप....
२४ मे २०११

Monday, May 23, 2011

तुझे उसासे कुणा कळावे..

.
तुझे उसासे कुणा कळावे मनात माझ्या अजून बाकी
जसा मृदेचा सुगंध सा-या घरात माझ्या अजून बाकी!!


बहार नाही तरी कळ्यांचे फुलून येणे नसे अचंबा!
पहाटवारा तुझ्या कुशीचा बनात माझ्या अजून बाकी!!


जमून आला सुयोग ऐसा नकोच आता मुहूर्त पाहू..
गुरू-शनीची जुनी मुजोरी करात माझ्या अजून बाकी!!


सुना सुना हा जुनाट चंदा हताश पाही फिका पडूनी!
उजेड घेण्या नसे उधारी नभात माझ्या अजून बाकी!!


कशास बोलू कशास सांगू उगा कुणाचे उणे-दुणे मी?
बरेच ऐकून घेतले ते उरात माझ्या अजून बाकी!


'जितू' तुला का नकोच होते विमुक्त होता सुखात जीणे?
(जिरूनही ती मिजास-मस्ती जिवात माझ्या अजून बाकी!)



....रसप....
२३ मे २०११
"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल - भाग ३" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली गझल.

अम्बुधि लहरों के शोर में.... - भावानुवाद

"मराठी कविता समुहा"च्या "कविता एक अनुवाद अनेक" ह्या उपक्रमासाठी केलेला भावानुवाद -

खवळला सागर तरीही पाहिला मी शांत तो
लाल आकाशास आणिक सागराला रंगतो
खग विहरती मुक्तछंदी गूज त्यांना सांगतो
आपल्या घरट्याकडेही तोच त्यांना धाडतो

दिवस गेला दगदगीचा, सांजवा खोळंबला
दूर क्षितिजाला रवी मी अस्त जातां पाहिला
मी किनारी, ओलडोळी दृश्य हे न्याहाळले
अन् हताशा कळवळूनी मी मनाशी चिंतले -

नववधू डोळ्यांत जेव्हा आसवांना माळते
स्वच्छ आभाळात जेव्हा ऊनही रेंगाळते
सांज जेव्हा दाटल्या काळोखडोही झोपते
सांग तेव्हा दु:खही मनमोहिनी ना वाटते?

मी अजूनी गुंतलो आहेच ह्या कोड्यामधे
गुरफटूनी राहिलो, पण उकल होते ही कुठे..?


-
मूळ कविता - अम्बुधि लहरों के शोर में....
कवी - दीपक कुमार
भावानुवाद - ....रसप....
२३ मे २०११



मूळ कविता:

अम्बुधि लहरों के शोर में
असीम शान्ति की अनुभूति लिए,
अपनी लालिमा के ज़ोर से
अम्बर के साथ – लाल सागर को किए,
विहगों के होड़ को
घर लौट जाने का संदेसा दिए,
दिनभर की भाग दौड़ को
संध्या में थक जाने के लिए
दूर क्षितिज के मोड़ पे
सूरज को डूब जाते देखा!

तब, तट पे बैठे
इस दृश्य को देखते
नम आँखें लिए
बाजुओं को आजानुओं से टेकते
इस व्याकुल मन में
एक विचार आया!
किंतु उस उलझन का,
परामर्श आज भी नही पाया!
की जब विदाई में एक दुल्हन रोती है,
जब बिन बरखा-दिन में धुप खोती है,
जब शाम अंधेरे में सोती है,
तब, क्या उदासी खुबसूरत नही होती है?


- दीपक कुमार

Sunday, May 22, 2011

परके

"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली तिसरी रचना -


सगळे हळूच येथे रडले जरा जरा
लपवून चेह-याला हसले जरा जरा

नयनांत अश्रु होते मुखडा उदासही
पण ढोंगही मला ते कळले जरा जरा

हृदयात मी जपावे तिजला कशामुळे
म्हणतो असे तरीही जपले जरा जरा

नशिबास दोष देणे जमलेच ना कधी
खटके उगाच माझे उडले जरा जरा

अपुल्याच माणसाला परके कसे म्हणा
परकेच आपलेसे वदले जरा जरा

दगडास ना कधीही दिसणार त्या 'जितू'
परि देवळासमोरी नमले जरा जरा


....रसप....
२१ मे २०११

Saturday, May 21, 2011

सुगंध

.

"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली दुसरी रचना -


सांडला सुगंध येथ वेचतो जरा जरा
कुंतलांत मी उगाच गुंततो जरा जरा


बाहुपाश भोवती असेच राहु दे सखे
मी तुझ्यातुनी तुलाच चोरतो जरा जरा


जन्म सार्थ जाहला खराच, प्रेम लाभुनी
स्वर्गतुल्यश्या सुखास भोगतो जरा जरा


हात जाहले परीस दिव्य तेज लोचनी
स्वाद अमृतासमान चाखतो जरा जरा


देव देवळात बांधला कधीच ह्या जगी
मी तुझ्यात ईश्वरास पाहतो जरा जरा


घाव झेलले अनेक जीवनात फक्त मी
वेदनांस साहुनी सुखावतो जरा जरा



....रसप....
२१ मे २०११

ह्याच उपक्रमासाठी आधी लिहिलेली रचना - "जरा जरा.."
.

Thursday, May 19, 2011

मनमौजी (बस स्टॉप वरच्या कविता)

बस स्टॉप म्हणजे समुद्रच
इथे हर त-हेचा मासा
कुणी आहे चिकना-चुपडा
तर कुणी लेचा-पेचा

इथे आहेत पांढरपेशे
इथे आहेत पेताड
कुणी आहे 'वेल सेटल्ड'
तर कुणी आहे बेकार..

कुणी बुढा.. लटपटणारा
कुणी तरणाबांड
कुणी आहे हाडाडलेला
कुणी माजला सांड

इथे असतात 'फक्कड' पोरी
लिपस्टिक खाऊन येतात
मैत्रिणीशी बोलता-बोलता
आय लायनर लावतात..!!

आज कुणाला थोडासा
उशीर झाला असतो..
कुणी उशीर होऊनसुद्धा
आरामातच असतो..!

आमच्यासारखे मनमौजी
आम्हीच असतो इथे
बसण्यासाठी येतो फक्त
जायचं नसतंच कुठे!

कुणी आम्हाला "टपोरी" म्हणतं
कुणी म्हणतं "गुंड"
कुणी म्हणे, "आजकालची
पिढीच असली षंढ!!"

पण आमच्याही मनामध्ये
काहीतरी रुतलंय
आयुष्यावर हसता-हसता
डोळ्यात काही खुपलंय

कुणी शोधतोय नोकरी
कुणी झालाय देवदास
कुणी जरा मागे पडलाय
कुणी झालाय नापास

चिंता करून झुरण्यापेक्षा
'झुरके' मारतो आम्ही
जगण्यासाठी मरण्याआधी
हसून घेतो आम्ही
.
.
.
.
.
.
पण तरी, उंदरांच्या शर्यतीत
धावायचंच आहे
एव्हढी सिगरेट संपल्यावर
निघायचंच आहे..!!



....रसप....
१९ मे २०११

Wednesday, May 18, 2011

आई तुझ्याचसाठी....


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेलं गीत..


आई तुझ्याचसाठी बेभान झुंजलो मी
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही
आई तुझ्यामुळे ह्या बाहूंत जोर होता
विझतोय प्राण माझा, पण तू समोर नाही


छातीवरी तुझ्या तो रोवून पाय होता
खवळून रक्त आले आवेश कोण होता
डोळ्यामध्ये तिरंगा, रक्तात तूच आई
बेहोष होऊनी मी केली अशी चढाई
शत्रूस ध्वस्त केले, ना मागमूस काही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही



तू सांग नातवाला माझीच वीरगाथा
संसार सोडला मी, तू सांध त्यास आता
होती अनेक स्वप्ने, ती राहिली मनाशी
चुकला हिशोब माझा विरल्या हवेत गाठी
मी चाललो, निघालो.. परतून येत नाही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही



भेदून ऊर माझा गेला न वार मागे
लढलो, अजिंक्य झालो, अभिमान आज वाटे
क्षण एक थांब काळा, आईस पाहू दे ना
पुत्रास आपल्या तू आई कुशीत घे ना
कर्जास फेडले मी, बाकी अजून काही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही




....रसप....
१८ मे २०११

Saturday, May 14, 2011

ते सांगतात काही..!!

"रघुनंदन बर्वे" ह्यांच्या कवितेतील "ते सांगतात काही" ह्या शब्दांनी भुरळ घातली.. आणि एक गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे...
पहा जमला का.....
.
.

ते सांगतात काही ते ऐकतात काही
असते मनात काही ते बोलतात काही


का भावविश्व माझे दावू कुणासही मी
दु:खावरी सुखाला आधारतात काही


ना सोबती कुणीही होता मला हवासा
माझा प्रवास पाहूनी चालतात काही


केला कधीच नाही मी द्वेष वेदनेचा
आनंदही जगी ह्या क्षण वाटतात काही!


बोलू नये परंतु ही बात खास आहे
देवासही "अधाशी" संबोधतात काही!


मद्यालयात माझे नाहीच रोज जाणे
रस्ते उगाच तेथे का पोचतात काही?


जीतू नको बघू तू मागे-पुढे मुळीही
हे चावले कधी ना, पण भुंकतात काही!



....रसप....
१२ मे २०११

Wednesday, May 11, 2011

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता.. - रसग्रहण

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता

ग्रेस

"ती गेली" म्हणजे नक्की कोण? पुढे येणा-या ओळीत "ती" म्हणजे "आई" हे स्पष्ट होतंय आणि त्याला पुष्टी देणारं कडवं त्याच्या मागोमाग आहे.

आता तपशीलवार बघुया...
.
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

.
"ती गेली तो दिवस इतका दु:खाचा होता की आभाळही, खुद्द निसर्ग (देवही) रिमझिम रिमझिम बरसून अश्रू ढाळत होते.." असा सरळसोट अर्थ असेल, असं मला वाटत नाही. कारण पुढे एका ओळीत कवी आपल्या नास्तिकतेबद्दलही काही बोलतो.. तसेच पाऊस जर रिमझिम असेल तर "निनादेल" कसा?

नळातून एकेक थेंब पडणारं पाणी जर जमिनीवर पडत असेल तर फार आवाज होत नाही.. पण तेच पाणी कळशीत पडत असेल तर टप्प-टप्प आवाज सुस्पष्ट ऐकू येतो.. तसाच हा पाऊस आत मनात रिमझिम बरसतोय आणि म्हणूनच घुमतोय.. निनादतोय.. कवी आतल्या आत रडतोय, त्याचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. तिच्या जाण्याने सर्व काही अंध:कारमय झालंय.. मळभ दाटून आलंय जणू.. त्यातून आपल्या भविष्याचा ठाव घेण्याचा कवी प्रयत्न करतोय.
.
तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

.
हे असं होणार आहे, हे ठाऊक होतंच.. काळ कधीचाच दाराशी येऊन ठेपला होता.. पण त्याने आज घाला घातल्यावर मनाची अवस्था अशी झालीय की मी काय बोलतोय ते कळत नाहीये आणि जे कळतंय ते बोलताच येत नाहीये..! काही तरी महाभयंकर शोकांतिका आहे ही.. तिचं जाणं नुसतंच जाणं नाहीये.. त्याचं कारण विदारक असणार..

.
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

.
इतका वेळ मी दाबून ठेवलेला आकांत अखेरीस बाहेर आलाच. जसं एखादा ढग आपल्या उरात पाणी साठवून ठेवतो आणि असह्य झाल्यावर धो-धो बरसतो, त्याच व्याकुळतेने अखेरीस माझे अश्रूही वाहिले... पण त्यावेळी दुनिया निर्विकारपणे आपल्यातच गर्क होती.. ह्या ढगाला, ह्या पावसाला पुढे नेणारा वारा.. पाचोळा उडवत होता..!
.
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

.
लहान वयात "दुनिया कळली". अवेळी प्रौढत्व आले.. जबाबदा-या आल्या.. "खिडकीवर एकटा धुरकट कंदील" हे त्या घरावर आलेल्या बिकट परिस्थितीचं द्योतक असावं.
.
हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता

.
ह्या ओळी काळीज पिळवटून काढतात. कवी कोवळ्या वयात सोसलेल्या आघातांनी आता निर्ढावला आहे, कोरडा झालाय..! द्रौपदीची अब्रू ज्या कृष्णाने वस्त्र देऊन वाचवली होती.. तो कृष्ण स्वत:च नागडा आहे.. लाचार आहे. इथे शोकांतिका जराशी कळते. आईवर झालेला अत्याचार/ अन्याय, त्या मुलाने पाहिलाय आणि म्हणूनच अशी निष्ठूर दुनिया बनविणा-या त्या विधात्यावर आता त्याचा विश्वासच नाही.. त्याच्या मते तो देव स्वत:च इतका लाचार आहे की आज त्यालाच द्रौपदीची गरज आहे..!!
ह्या कवितेत एक प्रवास आहे..
सुरुवातीस एक आघात.. पण आपल्या आकांतास दाबून ठेवणे... मग घुसमटणे... नंतर टाहो फोडणे... मग जबाबदारीची जाणीव होणे... आणि मग रूक्ष बनणे.... नास्तिक बनणे..

कवीने निरागसतेकडून नास्तिक होईपर्यंतचा प्रवास ह्या रचनेत रेखला आहे.

कुणास ठाऊक, मला जे ह्या कवितेतून कळले तो अन्वयार्थ बरोबर आहे की नाही... पण एक प्रयत्न केलाय.
चू. भू. द्या. घ्या.

धन्यवाद..!

Tuesday, May 10, 2011

सर झुकाओगे तो.... - भावानुवाद



दगडास रंगवूनी, बनवून देव त्याला
करता कितीक भक्ती, म्हणता कृतघ्न झाला?          

मज ठाव चोख आहे, मज ही खुबी प्रवाही
बस चाललो जिथे मी, रस्ता तिथेच झाला  

म्हणलास जीवना तू, कसल्या ख-या दिलाने!
जर तू न होय माझा, दुसरा कुणी मिळाला ! 

स्मरतोय ईश्वराला, मदिरेस प्राशताना
बनलाय अमृताचा, जहरी नसेच प्याला  

सगळ्या महाभुतांचा बस एक तोच स्वामी
वसलेत कोण कोठे, दिसतेच सर्व त्याला

-
मूळ रचना: सर झुकाओगे तो....
मूळ कवी: बशीर बद्र
भावानुवाद: ....रसप....
१० मे २०११

वृत्त कल्याणी (स्वामीजी कृत): ललगालगा लगागा ललगालगा लगागा


मूळ रचना:

सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा
इतना मत चाहो उसे, वो बेवफ़ा हो जाएगा


हम भी दरिया हैं, हमें अपना हुनर मालूम है
जिस तरफ भी चल पड़ेंगे, रास्ता हो जाएगा


कितनी सच्चाई से मुझ से ज़िन्दगी ने कह दिया
तू नहीं मेरा, तो कोई दूसरा हो जाएगा


मैं ख़ुदा का नाम लेकर पी रहा हूँ दोस्तो
ज़हर भी इसमें अगर होगा, दवा हो जाएगा


सब उसी के हैं हवा, ख़ुश्बू, ज़मीनो-आसमाँ
मैं जहाँ भी जाऊँगा, उसको पता हो जाएगा



- बशीर बद्र

Monday, May 09, 2011

मज आज खरी कळली कविता..

मज आज खरी कळली कविता
जगण्यावरती स्फुरली कविता

उगवेल कसा रवि मावळता
नयनांत तुझ्या दिसली कविता

तुज ना कळले, मज आकळले
अन प्रेमकथा बनली कविता

झटतात किती विजयी बनण्या
विजयात कधी हरली कविता

दिसतात कुणा जखमा लपल्या
हसता दुनिया दुखली कविता

बदनाम, खुळा म्हणतात मला
हकनाक उरी जपली कविता

रममाण जितू जगण्यात इथे
उधळून सुखे जमली कविता


....रसप....
९ मे २०११

Sunday, May 08, 2011

सुचली कविता

तुजला बघता सुचली कविता
हसता हसता सुचली कविता

रुसवे-फुगवे सगळे हरले
नशिबास अता सुचली कविता 

बहरून मनास म्हणे बगिचा
सुमने फुलता सुचली कविता

बघतेस कशी झुरवून उगा
जळुनी उरता सुचली कविता

मज जाणवते दुखणे सरले
जखमा जपता सुचली कविता

विसरून कथा सगळीच जुनी
मनची लिहिता सुचली कविता

चल आज जरा क्षितिजास बघू
नभ ओसरता सुचली कविता

जगणे उसने नव्हतेच 'जितू'
मरता-मरता सुचली कविता


....रसप....
८ मे २०११  


वृत्त 'तोटक' - ललगा ललगा ललगा ललगा 

Thursday, May 05, 2011

मी न माझा राहिलो

आपल्यासाठीच जगता मी न माझा राहिलो
शोधली आनंदगंगा मी न माझा राहिलो


जीवनाला पर्वताच्या सारखे मी पाहिले
चालुनी उत्तुंग येता मी न माझा राहिलो


वेगळेसे सूर माझे रागदारी सोडुनी
रंगवूनी दंग होता मी न माझा राहिलो


बंध जीवापाड सारे नेहमी मी पाळले
जाहला साराच गुंता, मी न माझा राहिलो


आरश्याशी वाद झाला दाविले त्याने तुला
हाय! केले प्रेम आता मी न माझा राहिलो !


पश्चिमेचा गार वारा रातराणी माळता
कुंतलांशी खेळताना मी न माझा राहिलो


मित्र सारे खास होते खास होते शत्रुही
न्याय सा-यांनाच देता मी न माझा राहिलो


जीत, ईर्ष्या जिंकण्याची नेहमी तू बाणली
ह्या जगाला जिंकताना मी न माझा राहिलो....!



....रसप....
५ मे २०११

Wednesday, May 04, 2011

वठलेले झाड - २

वाढ करून वठवण्यापेक्षा
अंकुरच दाबला असतास
माझ्या जागी एखाद्याचा
डेरा बसवला असतास

एखादंच फूल फुललं असतं
आसमंतात दरवळलं असतं
त्याच्या दिलखुश हासण्याने
जीवन सफल वाटलं असतं

बाभळी-निवडुंग हिरवे ठेवतोस
अमर्याद वडाला पारंब्या फोडतोस
उपद्रवी तणांना कुठेही वाढवतोस
सडलेल्यावर बुरशीला कशासाठी पोसतोस?

उत्तर मिळणार नाही, मला माहित आहे
मी, वठल्या जागीच एक दिवस कोसळणार आहे

फक्त एक कर...

ह्या वठलेल्या झाडाची राख.. तूच 'राख'
पाण्यात गेली, तर नदी आटेल..
जमिनीत गेली, तर नापीक होईल
आणि हवेत उडली तर ढग पांढरे होतील..

माझ्या मरणाने तरी तुला रडू येऊ दे..
एका थेंबाने सारं पुन्हा बहरू दे...


....रसप....
४ मे २०११

.
वठलेले झाड - १ -
http://ransap.blogspot.com/2011/05/blog-post.html

Tuesday, May 03, 2011

रुख़ से परदा उठा दे.... - भावानुवाद

चेहरा मोहिनी पाहु दे ना तुझा मैफलीचा पहा नूर बदले जरा
झिंगलेल्यास येई कशी शुद्धही? झोक जाऊनही तोल राखे जरा !

बोलु काही नको फक्त ये, बैस तू, वेदनाही मला आपली भासते
तू इथे पाहुनी कोण जाणे कसा मृत्युही हासला, थांबलाहे जरा !

मी निखारा असा, होतसे राखही इष्ट नाही तुला ही झळा लागणे
राहु दे लोचनी ओल माझ्या तशी तप्त आहेत हे आसु माझे जरा

तू फुले तोडता काळजी घे अशी ना डहाळी हलावी न आवाज हो
बाग नाही पुन्हा हा बहरणार रे दर्द होई कळ्यांना जपावे जरा

मूळ गझल - रुख़ से परदा उठा दे....
मूळ शायर - अनवर मिर्ज़ापुरी
भावानुवाद - ....रसप....
३ मे २०११


मूळ गझल -

रुख़ से परदा उठा दे ज़रा साक़िया
बस अभी रंग-ए-महफ़िल बदल जायेगा
है जो बेहोश वो होश में आयेगा
गिरनेवाला जो है वो संभल जायेगा

तुम तसल्ली ना दो सिर्फ़ बैठे रहो
वक़्त कुछ मेरे मरने का टल जायेगा
क्या ये कम है मसीहा के रहने ही से
मौत का भी इरादा बदल जायेगा

मेरा दामन तो जल ही चुका है मग़र
आँच तुम पर भी आये गंवारा नहीं
मेरे आँसू ना पोंछो ख़ुदा के लिये
वरना दामन तुम्हारा भी जल जायेगा

फूल कुछ इस तरह तोड़ ऐ बाग़बाँ
शाख़ हिलने ना पाये ना आवाज़ हो
वरना गुलशन पे रौनक ना फ़िर आयेगी
हर कली का दिल जो दहल जायेगा

- अनवर मिर्ज़ापुरी

Monday, May 02, 2011

वठलेले झाड - १

 

तिचा चेहरा उद्ध्वस्त
एका डोळ्यात उद्विग्नता
एका डोळ्यात विखारी घृणा

तिची नजर माझ्यावर थांबत नाही
तिचा हात हाती घेण्याची माझ्यात हिंमत नाही

माझा काही गुन्हा नाही
पण मला शाप आहे
दोष माझा काहीच नाही
पण मला भोग आहे

पुरुष असूनही नपुंसकत्व
वठलेल्या झाडाचं अस्तित्व
मला मंजूर आहे..
फक्त..
एकदा जोरात हुंदका फोडायची परवानगी दे
जगाला काही वेळ बधीर कर, अंधत्व दे
मी माझ्या मनात दाबून ठेवलेला आक्रोश
एकदाच बाहेर काढीन..
आणि पुन्हा तयार होईन...
विखार झेलायला..

कारण कुणी मानो वा न मानो...
मी नपुंसक नाही..
मी पुरुष आहे
पुरुषच आहे.


....रसप....
२ मे २०११
Related Posts Plugin for WordPress, Blogger...