Monday, October 18, 2010

मूक मी नसे

बोलतो जरी शब्द मोजके
वाचशी न का नेत्र बोलके

माझिया मनी तूच राहते
सांग का असे हेच थोडके?

इश्क का कधी सिद्ध होतसे
सोड सोड हा हट्ट लाडके

दोष हा स्वभावीच मूळचा
बोलणे इथे अल्प सारखे

मूक मी नसे चूक तू नसे
व्यर्थ हे तुला प्रेम जाळते


....रसप....
१८ ऑक्टोबर २०१०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...