Monday, September 26, 2011

अशी लाडकी लेक माझी असावी....


कळी मोहरावी तशी ती हसावी      
तिची पापणी अमृताने भिजावी
गुलाबी खळी लाल गाली पडावी
अशी लाडकी लेक माझी असावी



तिचे हट्ट सारे पुरे मी करावे
मला आवडीने तिनेही छळावे
तिचे त्रास देणे, मजा खास यावी
अशी लाडकी लेक माझी असावी


 
तिचा राग नाकावरी रंग घ्यावा
मला पाहुनी तो जरा ओघळावा
व्यथा गोड माझी तिला आकळावी
अशी लाडकी लेक माझी असावी


तिचे बोलणे आरश्याला कळावे!
तिचे लाजणे पाकळीने पहावे
नटावे तिने चांदणी अन् झुकावी
अशी लाडकी लेक माझी असावी


पुढे काळ जाता असा काळ यावा
नको वाटुनीही बनावा दुरावा
शिवाच्या घरी पार्वती ती निघावी
अशी लाडकी लेक माझी असावी


कधी ह्या मनाशी निराशा उरावी
जरा आस थोडी मला ना दिसावी
तिला पाहता अन् उभारी मिळावी
अशी लाडकी लेक माझी असावी









....रसप....
२६ सप्टेंबर २०११
("राष्ट्रीय कन्या दिन - २५ सप्टेंबर" विशेष "मराठी कविता समूहा"चा उपक्रम "लेक लाडकी" साठी) 
सर्व छायाचित्रे - सौ. रश्मी सुळे 

4 comments:

  1. khupch chaan kavita... kadachit aasach lala lavnarya eka lekicha mee pan baap aslyamule aankhi bhavli. Best!!

    ReplyDelete
  2. waha.....

    ekadha chaltchitrapat pahilyasarakh vatatey.....


    khup surekh....

    ReplyDelete
  3. खरच अशी लाडकी लेक माझीही असावी! खूप खूप छान!

    ReplyDelete
  4. महेश नाईक
    खुपच छान आणि मनाला भिडणारं काव्य. वाचून आपल्या लेकीबद्दलच्या भावना उचंबळून येतात.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...