Thursday, June 02, 2011

अपने होने का....भावानुवाद

प्रत्येक ओळीत २८ मात्रा जपून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.


जाणीव माझ्या असण्याचीच करवून देत होतो
हातामध्ये राख घेऊन भिरकून देत होतो

वठुन गेले होते म्हणून ज्यांना तोडले होते
म्हणती वारा तुजला शाखा हलवून देत होतो

सत्यवचन केवळ त्याचे होते त्याच्या मैफिलीत
रुकार त्याला हाताला मी उचलून देत होतो

पाहुन मजला झुकती त्या माना वडीलधा-यांच्या
आशिर्वचास मस्तक जेथे झुकवून देत होतो

एके काळी हत्यारेही भलेच होते वाटे
पाणी पाजुन नंतर म्हणती, "सणकून देत होतो"

सदैव मजला लाखोली तो वाही येथे तेथे
ऐकुन त्याचे कविता माझी सुनवून देत होतो

मी घराला उभारता झालो पुरता वेडा खुळा
उभारलेल्या भिंतीला मी ढकलून देत होतो

आतापासुन खोट्याला मी मानीन आपलेसे
खरे वागण्याची मी किंमत चुकवून देत होतो




मूळ कविता - अपने होने का हम...
मूळ कवी - राहत इंदौरी
भावानुवाद - ....रसप....
२ जून २०११



मूळ कविता:

अपने होने का हम इस तरह पता देते थे
खाक मुट्ठी में उठाते थे, उड़ा देते थे

बेसमर जान के हम काट चुके हैं जिनको
याद आते हैं के बेचारे हवा देते थे

उसकी महफ़िल में वही सच था वो जो कुछ भी कहे
हम भी गूंगों की तरह हाथ उठा देते थे

अब मेरे हाल पे शर्मिंदा हुये हैं वो बुजुर्ग
जो मुझे फूलने-फलने की दुआ देते थे

अब से पहले के जो क़ातिल थे बहुत अच्छे थे
कत्ल से पहले वो पानी तो पिला देते थे

वो हमें कोसता रहता था जमाने भर में
और हम अपना कोई शेर सुना देते थे

घर की तामीर में हम बरसों रहे हैं पागल
रोज दीवार उठाते थे, गिरा देते थे

हम भी अब झूठ की पेशानी को बोसा देंगे
तुम भी सच बोलने वालों के सज़ा देते थे..


- राहत इंदौरी


"मराठी कविता समुहा"च्या "कविता एक अनुवाद अनेक" ह्या उपक्रमासाठी केलेला भावानुवादाचा प्रयत्न.

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...