Saturday, June 25, 2011

दाटला अंधार का ?


मी निवारा जाळुनीही दाटला अंधार का ?
जीवनाला पोसताना पाशवी संहार का ?


कर्म-धर्माच्या ख-या संकल्पना सांगा कुणी
अंतरी हा द्वेषरूपी पेटला अंगार का ?


संपले सारे तरीही राहिल्या काही खुणा
साज माझा मोडला छेडी तरी गंधार का ?


जो कधी श्रीमंत होता भीक त्याला लागली
मोल त्या आभूषणांचे राहिले भंगार का ?


थोर जाणावे कुणाला क्षुद्र सारे वाटती !
सांग तू जो निर्मिलासी तोच हा संसार का ?


मंदिरी तो राहतो हे सत्य मी मानू कसे ?
त्याच गाभा-यामध्ये हा दांभिकी संचार का ?



....रसप....
२५ जून २०११

1 comment:

  1. झाकले कोणी कुणाला सावली आली कशी?
    तूच केसांचा मघाशी सोडला संभार का ?

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...