Sunday, January 31, 2010

आसवांचं मोल.... I QUIT

 

आसवांचं मोल काय सांगू
ती तर वाहिलीच नाहीत
काही केल्या ते डोळे
मुळी भिजलेच नाहीत
हाच तो सागर.. अखंड खळखळणारा
त्यालाही तळ आहे
कधी जाणवलंच नाही

काय होतं त्या डोळ्यांत?
दु:ख..? पश्चात्ताप..? अंगार..?
नाही.. त्यात होता अंधार..
प्रखर उजळलेला अंधार
जाळणारा अंधार
त्या अंधाराच्या दाहकतेला शांतवणारा दीपक
विझला होता
सारं काही पेटवून
नि:स्तब्ध निजला होता
सगळ्या प्रश्नांची उत्तरं
एका वाक्यात देऊन
आशा-आकांक्षांना
एका चिट्ठीत लिहून
बोलला होता…
“I QUIT”

आज कळलं ..
आसवांचं मोल तेव्हा
ती वाहतच नाहीत जेव्हा......

....रसप....
२९ जानेवारी २०१०

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...