'रॉकस्टार' मधील 'कून फाया कून..' चा अनुवाद/ भावानुवाद करायचे अनेक दिवस मनात घोळत होते. पण काही केल्या जमत नव्हता. कारणे अनेक..
१. मूळ गीत इतके भिनले होते की विचारचक्र चालू होतच नसे..
२. मूळ गीत नीट वाचल्यास लक्षात येते की त्याला कुठलाही विशिष्ट आकृतिबंध तर नाहीच, पण यमकसुद्धा पाळलेले नाहीत. अनुवाद करताना शक्यतो मूळ गीताच्या चालीवर करायची मला आवड आहे, पण ह्या गीताबाबत मी लय पकडण्यासाठी कुठलाच आधार पकडू शकलो नाही.
३. गाण्यात काही फारसी/ उर्दू शब्दप्रयोग (सदाक़ अल्लाहुल....) व काही संदर्भ (या निझामुद्दीन....) असे आहेत, ज्यांचा अनुवाद केला जाऊ शकत नाही किंवा केल्यास त्यात काही मजा येणार नाही.
शेवटी अनेक दिवस विचार करायचा प्रयत्न केल्यावर मी चालीवर न लिहिता मूळ गीताप्रमाणेच भरपूर मोकळीक घेऊन लिहिण्याचे ठरवले आणि तसेच केले. हा अनुवाद वाचताना म्हणूनच किंचित विस्कळीत वाटेल, पण त्यातही मी थोडासा Format जपायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून एखादी स्वतंत्र चाल तरी नक्कीच दिली जाऊ शकेल.
टीप - मूळ गीत ज्यांनी ऐकलं नसेल, त्यांनी ते माझ्या आग्रहाखातर अवश्य ऐकावे.
======================================================
अनुवाद -
पुढे जरासे पाउल घे
कमी होउ दे अंतर हे
जीवनातले रितेपण हे दूर कर माझ्या
तुझ्याविनाचे रितेपण हे दूर कर आता
रितेपणाही जगात नव्हता तेव्हा होता तोच एकटा
तुला मला तो व्यापुन उरला, त्याची माया, तोच विधाता
तन मन माझे रंगव तू
मोबदला घे जीवन तू
सोनसकाळी किरणे येती नाव तुझे घेऊन
माझ्यामधल्या अंधाराला तूच टाक दिपवून
तुझ्या पायरीवरती माझे मन जाते उजळून
भगवंता रे, दयाघना घे आज मला व्यापून.........
एव्हढेच तू माझ्यावरती कर उपकार
माझ्यापासुन मलाच मुक्ती दे सरकार..
मलाच माझा दिसो चेहरा बेदरकार
माझे मजला कळून येवो सर्व विकार
भ्रम माझे घेऊन चालले मला कुठे ?
माझ्या कर्माचे झेपे ना मज ओझे
समजे ना हे पाउल नेते मला कुठे ?
माझ्यामध्ये तू सामावून
तुझ्याच मागुन माझे पाउल
तुझ्यामधे मीही सामावून
तुझ्याच मी छायेला ओढून
तुझ्याच हातुन मी घडलो
जगास नाही आवडलो
तुझ्याच प्रेमावरी मदार
तूच सत्य अन तू आधार
रितेपणाही जगात नव्हता तेव्हा होता तोच एकटा
तुला मला तो व्यापुन उरला, त्याची माया, तोच विधाता
त्याची माया, तोच विधाता
त्याची माया, तोच विधाता
स्वैर भावानुवाद - ....रसप....
मूळ गीत/ प्रेरणा - 'कून फाया कून..'
मूळ गीतकार - इर्शाद क़मिल
चित्रपट - रॉकस्टार
मूळ गीत -
या निझामुद्दीन औलिया,
या निझामुद्दीन सल का
क़दम बढ़ा ले,
हदों को मिटा ले,
आजा खालीपन में, पी का घर तेरा
तेरे बिन खाली आजा खालीपन में.
रंगरेज़ा रंगरेज़ा
रंगरेज़ा रंगरेज़ा
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था
वोही था, वोही था, वोही था
वोह जो मुझ में समाया,
वोह जो तुझ में समाया
मौला वही वही माया.
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
सदाक़ अल्लाहुल अलिय्युल अज़ीम
रंगरेज़ा रंग मेरा तन मेरा मन,
ले ले रंगाई चाहे तन चाहे मन.
सजरा सवेरा मेरे तन बरसे
कजरा अँधेरा तेरी जाँ की लौ...
क़तरा मिला जो तेरे दरबर से
ओ मौला... मौला...
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था
वोही था, वोही था, वोही था
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
सदाक़ अल्लाहुल अलिय्युल अज़ीम
सदक़ रसूल उल नबी उल करीम
सल्लल्लाहु अलय्ही व सल्लम
हो मुझ पे करम सरकार तेरा,
अरज़ तुझे कर दे मुझे मुझसेही रिहा,
अब मुझको भी हो दीदार मेरा,
कर दे मुझे मुझसेही रिहा,
मुझसेही रिहा
मन के मेरे यह भरम,
कच्चे मेरे यह करम,
लेके चलें हैं कहाँ
मैं तो जानू ना
तू हैं मुझ में समाया
कहाँ लेके मुझे आया.
मैं हूँ तुझ में समाया
तेरे पीछे चला आया,
तेराही मैं इक साया
तूने मुझको बनाया
मैं तो जग को न भाया,
तूने गले से लगाया,
हक़ तूही हैं खुदाया
सच तूही हैं खुदाया
कुन! फ या कुन!,
कुन! फ या कुन!
जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था
वोही था, वोही था, वोही था
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
सदाक़ अल्लाहुल अलिय्युल अज़ीम
सदक़ रसूल उल नबी उल करीम
सल्लल्लाहु अलय्ही व सल्लम
सल्लल्लाहु अलय्ही व सल्लम
- इर्शाद क़मिल