Wednesday, July 15, 2009

पहिलं प्रेम - चौथीमधलं


पहिलं प्रेम - चौथीमधलं
पुन्हा एकदा करायचंय
पुन्हा एकदा माझ्यावर
तिला हसताना पाहायचंय
काही गोष्टी चुकून सुटतात
आणि काही सुटून चुकतात
चुकलेलं, सुटलेलं बरंच काही
पुन्हा एकदा जमवायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

तिची हुशारी अभ्यासातली
माझी होती खोड्यांमधली
तिला मिळती शाबासक्या
मला नेहमी उठा-बश्या
पहिला नंबर दोघांचाही
तिचा वरून, माझा खालून
- एकदा तरी बदलायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

मागल्या बाकावरची माझी
जागा होती ठरलेली
तिरका कोन साधून गुपचुप
नजर तिला भिडलेली
सर मला नेमके तेव्हाच
प्रश्न काही करायचे
- आणि नंतर झोडायचे
एकदा तरी मला त्यांना
उत्तर चोख द्यायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय


अजून पाचवीतला पहिला दिवस
मनात तसाच आहे
नवे शहर, नवी शाळा
सारं नवीन आहे
एकदाही तिच्याशी
बोललो सुद्धा नाही
आज सुद्धा त्याची
बोच मनात आहे

गाव माझे सोडण्याआधी
एकदा तिला भेटायचंय
काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्हायचंय

काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्हायचंय


....रसप....
१४ जुलै २००९



8 comments:

  1. तिला मिळती शाबासक्या
    मला नेहमी उठा-बश्या
    पहिला नंबर दोघांचाही
    तिचा वरून, माझा खालून
    - एकदा तरी बदलायचंय
    काही करून आयुष्यात
    एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय

    गाव माझे सोडण्याआधी
    एकदा तिला भेटायचंय

    .....khup laybaddh aani sundar kavita

    ReplyDelete
  2. Mast ahe Ranjit..
    Mi olkhato ka tila?

    ReplyDelete
  3. kavita khupach chan ahe

    ReplyDelete
  4. चौथीतले प्रेम .. खूप आवडले

    ReplyDelete
  5. hi,
    kupach chan lihala aahe..

    Padmashri patil

    ReplyDelete
  6. कविता खुप आवडली





    विजय

    ReplyDelete
  7. खूप मस्त कविता आणि खूपच छान रीतीने भावना व्यक्त केल्या आहेत. त्या लहान वयातला ते हळुवार क्षण अगदी मस्त वेचले आहेस . एकच कि कवितेचे नाव पुन्हा लहान व्ह्याचा आहे असा ठेवला असता तर जास्ती समर्पक वाटलं असत.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...