आपल्यासाठीच जगता मी न माझा राहिलो
शोधली आनंदगंगा मी न माझा राहिलो
जीवनाला पर्वताच्या सारखे मी पाहिले
चालुनी उत्तुंग येता मी न माझा राहिलो
वेगळेसे सूर माझे रागदारी सोडुनी
रंगवूनी दंग होता मी न माझा राहिलो
बंध जीवापाड सारे नेहमी मी पाळले
जाहला साराच गुंता, मी न माझा राहिलो
आरश्याशी वाद झाला दाविले त्याने तुला
हाय! केले प्रेम आता मी न माझा राहिलो !
पश्चिमेचा गार वारा रातराणी माळता
कुंतलांशी खेळताना मी न माझा राहिलो
मित्र सारे खास होते खास होते शत्रुही
न्याय सा-यांनाच देता मी न माझा राहिलो
जीत, ईर्ष्या जिंकण्याची नेहमी तू बाणली
ह्या जगाला जिंकताना मी न माझा राहिलो....!
....रसप....
५ मे २०११
शोधली आनंदगंगा मी न माझा राहिलो
जीवनाला पर्वताच्या सारखे मी पाहिले
चालुनी उत्तुंग येता मी न माझा राहिलो
वेगळेसे सूर माझे रागदारी सोडुनी
रंगवूनी दंग होता मी न माझा राहिलो
बंध जीवापाड सारे नेहमी मी पाळले
जाहला साराच गुंता, मी न माझा राहिलो
आरश्याशी वाद झाला दाविले त्याने तुला
हाय! केले प्रेम आता मी न माझा राहिलो !
पश्चिमेचा गार वारा रातराणी माळता
कुंतलांशी खेळताना मी न माझा राहिलो
मित्र सारे खास होते खास होते शत्रुही
न्याय सा-यांनाच देता मी न माझा राहिलो
जीत, ईर्ष्या जिंकण्याची नेहमी तू बाणली
ह्या जगाला जिंकताना मी न माझा राहिलो....!
....रसप....
५ मे २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!