.
तुझे उसासे कुणा कळावे मनात माझ्या अजून बाकी
जसा मृदेचा सुगंध सा-या घरात माझ्या अजून बाकी!!
बहार नाही तरी कळ्यांचे फुलून येणे नसे अचंबा!
पहाटवारा तुझ्या कुशीचा बनात माझ्या अजून बाकी!!
जमून आला सुयोग ऐसा नकोच आता मुहूर्त पाहू..
गुरू-शनीची जुनी मुजोरी करात माझ्या अजून बाकी!!
सुना सुना हा जुनाट चंदा हताश पाही फिका पडूनी!
उजेड घेण्या नसे उधारी नभात माझ्या अजून बाकी!!
कशास बोलू कशास सांगू उगा कुणाचे उणे-दुणे मी?
बरेच ऐकून घेतले ते उरात माझ्या अजून बाकी!
'जितू' तुला का नकोच होते विमुक्त होता सुखात जीणे?
(जिरूनही ती मिजास-मस्ती जिवात माझ्या अजून बाकी!)
....रसप....
२३ मे २०११

"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल - भाग ३" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली गझल.
apratim
ReplyDelete