Monday, May 09, 2011

मज आज खरी कळली कविता..

मज आज खरी कळली कविता
जगण्यावरती स्फुरली कविता

उगवेल कसा रवि मावळता
नयनांत तुझ्या दिसली कविता

तुज ना कळले, मज आकळले
अन प्रेमकथा बनली कविता

झटतात किती विजयी बनण्या
विजयात कधी हरली कविता

दिसतात कुणा जखमा लपल्या
हसता दुनिया दुखली कविता

बदनाम, खुळा म्हणतात मला
हकनाक उरी जपली कविता

रममाण जितू जगण्यात इथे
उधळून सुखे जमली कविता


....रसप....
९ मे २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...