सगळे हळूच येथे रडले जरा जरा
लपवून चेह-याला हसले जरा जरा
नयनांत अश्रु होते मुखडा उदासही
पण ढोंगही मला ते कळले जरा जरा
हृदयात मी जपावे तिजला कशामुळे
म्हणतो असे तरीही जपले जरा जरा
नशिबास दोष देणे जमलेच ना कधी
खटके उगाच माझे उडले जरा जरा
अपुल्याच माणसाला परके कसे म्हणा
परकेच आपलेसे वदले जरा जरा
दगडास ना कधीही दिसणार त्या 'जितू'
परि देवळासमोरी नमले जरा जरा
....रसप....
२१ मे २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!