Wednesday, May 04, 2011

वठलेले झाड - २

वाढ करून वठवण्यापेक्षा
अंकुरच दाबला असतास
माझ्या जागी एखाद्याचा
डेरा बसवला असतास

एखादंच फूल फुललं असतं
आसमंतात दरवळलं असतं
त्याच्या दिलखुश हासण्याने
जीवन सफल वाटलं असतं

बाभळी-निवडुंग हिरवे ठेवतोस
अमर्याद वडाला पारंब्या फोडतोस
उपद्रवी तणांना कुठेही वाढवतोस
सडलेल्यावर बुरशीला कशासाठी पोसतोस?

उत्तर मिळणार नाही, मला माहित आहे
मी, वठल्या जागीच एक दिवस कोसळणार आहे

फक्त एक कर...

ह्या वठलेल्या झाडाची राख.. तूच 'राख'
पाण्यात गेली, तर नदी आटेल..
जमिनीत गेली, तर नापीक होईल
आणि हवेत उडली तर ढग पांढरे होतील..

माझ्या मरणाने तरी तुला रडू येऊ दे..
एका थेंबाने सारं पुन्हा बहरू दे...


....रसप....
४ मे २०११

.
वठलेले झाड - १ -
http://ransap.blogspot.com/2011/05/blog-post.html

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...