ऑफिस-घर-जेवण-झोप
ऑफिस-घर-जेवण-झोप
हे काय लाईफ आहे?
छ्या: भलतंच बोरिंग आहे!
काही तरी Happening असायला हवं
लाईफ मध्ये Excitement असायला हवं
धम्माल हवी.. मस्ती हवी
यारी हवी.. दोस्ती हवी !
कधी थोडासा माज हवा
बेशिस्तीचा साज हवा
मोकाट सुटावं... बेफाम बनावं..
आयुष्याचीच नशा करून
बेताल नाचावं!
कुणी म्हणेल वेडा
कुणी म्हणेल बेवडा
कुणी म्हणेल मस्तवाल
कुणी म्हणेल माजोरडा !
पण मी मात्र आनंदात न्हाऊन चिंब असीन
अथांगश्या आकाशाला पायाखाली बघीन
लाईफची OS सुद्धा बहुतेक Windows च असते
अधून मधून F5 ची आवश्यकता असते..!
एका दिवसासाठी का होईना मला unstressed व्हायचंय
कधी भेटताय दोस्तांनो? मला Refresh व्हायचंय..
....रसप....
२८ ऑगस्ट २०११
I know very little marathi, feel your post is about a comparison between life and computer. Wishing the features of computer present in real life. Hope I'm right. Nice concept.
ReplyDeleteखरच छान लिहिली आहे कविता.. माला देखिल रिफ्रेश व्हायचे वाटते..मस्त तुमच्या कवितेवरून मला देखिल टेक्निकल शब्दा सह कविता लिहावे असे वाटते.
ReplyDeletekharach khoop sundar kavita aahe.. aj pratyekala asach refresh whaavas watatay.... agdi nemakya shabdaat tumhi maandalay... khoop chaan waatali hi kavita waachun..
ReplyDelete