इथेच नावारुपास आलो तुम्हासमोरी हळूहळू
तुम्हीच द्यावे धडे, बनावी मला शिदोरी हळूहळू
उरी जपावे कृतज्ञतेला मिळे कुणाला जसे-तसे
नभात चंद्रामुळेच हासे जशी चकोरी हळूहळू
पहाट होते निशा सरूनी दिसे कवडसा तमातुनी
सुखापुढेही उदासतेची सरे मुजोरी हळूहळू
मनास लाभे कधी न येथे क्षणापुरेशी निवांतता
स्वत: स्वत:ला अशीच गावी मनात लोरी हळूहळूकशास सांगे उगाच मोठेपणा तुझा तूच फोफसा
पुन्हा न व्हावी कुठेच बोलायचीच चोरी हळूहळू
किती लिहावे किती रचावे तरी न तृप्ती मिळे 'जितू'
तुझ्या लिखाणात काच व्हावी जणू बिलोरी हळूहळू
....रसप....
१८ जून २०११
"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल (भाग - ५)" ह्या उपक्रमासाठी गझल लिहिण्याचा माझा प्रयत्न.
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!