पावसात आठवणी
दाटल्यात आज उरी
तू इथे नसे परि हे
तेच थेंब त्याच सरी
रंग रंग रंगविल्या
धुंद धुंद गंधविल्या
ये झुळूक, चिंब करी
तेच थेंब त्याच सरी
जागवून जागवल्या
हासवून पाझरल्या
ऐकशील खास कधी
बोलशील तूच कधी
ठेवशील तू अधरी
तेच थेंब त्याच सरी
घे मिठीत गार हवा
घे मुठीत ओल दवा
सांधतील पूर्ण दरी
तेच थेंब त्याच सरी
....रसप....
१३ जून २०११
दाटल्यात आज उरी
तू इथे नसे परि हे
तेच थेंब त्याच सरी
रंग रंग रंगविल्या
धुंद धुंद गंधविल्या
ये झुळूक, चिंब करी
तेच थेंब त्याच सरी
जागवून जागवल्या
हासवून पाझरल्या
मी निशा कितीक, तरी -
तेच थेंब त्याच सरी ऐकशील खास कधी
बोलशील तूच कधी
ठेवशील तू अधरी
तेच थेंब त्याच सरी
घे मिठीत गार हवा
घे मुठीत ओल दवा
सांधतील पूर्ण दरी
तेच थेंब त्याच सरी
....रसप....
१३ जून २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!