रिमझिम सुरु झाल्यावर काँक्रिटचा वास येतो
तेव्हा जाणवतं की मी शहरामध्ये राहतो
दोन तास जायला दोन तास यायला....
बारा तास ऑफीस, दिवस असाच सरला
थोडा वेळ जेवण-खाण गप्पा टप्पा अन् अर्धवट झोपेला
सरत्या दिवसांची गणतीही होत नाही
की नवा दिवस येतो
तेव्हा जाणवतं की मी शहरामध्ये राहतो
बालपणीचे, शाळेतले
कॉलेजचे, गल्लीतले....
आपापल्या व्यापांमध्ये सगळेच गुंतले
असाच एक खेळगडी 'फेसबुक' वरती भेटतो ..
गप्पा रंगतात,
मग कळतं आम्ही एकाच सोसायटीत राहतो!!
स्वतःच स्वतःला हसून
आम्ही संध्याकाळचे ठरवतो
मग तो ही म्हणतो मी ही म्हणतो..
आम्ही शहरामध्ये राहतो!!
..रसप..
तेव्हा जाणवतं की मी शहरामध्ये राहतो
दोन तास जायला दोन तास यायला....
बारा तास ऑफीस, दिवस असाच सरला
थोडा वेळ जेवण-खाण गप्पा टप्पा अन् अर्धवट झोपेला
सरत्या दिवसांची गणतीही होत नाही
की नवा दिवस येतो
तेव्हा जाणवतं की मी शहरामध्ये राहतो
बालपणीचे, शाळेतले
कॉलेजचे, गल्लीतले....
आपापल्या व्यापांमध्ये सगळेच गुंतले
असाच एक खेळगडी 'फेसबुक' वरती भेटतो ..
गप्पा रंगतात,
मग कळतं आम्ही एकाच सोसायटीत राहतो!!
स्वतःच स्वतःला हसून
आम्ही संध्याकाळचे ठरवतो
मग तो ही म्हणतो मी ही म्हणतो..
आम्ही शहरामध्ये राहतो!!
..रसप..
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!