.
श्वासांत गंध ओला दाटून मेघ येता
माझ्या मनामध्येही पाऊस प्रेमवेडा
श्वासांत गंध ओला दाटून मेघ येता
माझ्या मनामध्येही पाऊस प्रेमवेडा
गा तू सुरेल गाणे रे कोकिळा मनाच्या
दे छेद अंतराला ओथंबल्या घनाच्या
करण्यास चिंब आला ... पाऊस प्रेमवेडा
होणार सत्य आता जे स्वप्न पाहिले मी
माझ्या मनातला तू, आहे तुझीच मीही
बरसे मनांत दोन्ही ... पाऊस प्रेमवेडा
मृद्गंध साजणा तू केलेस धुंद मजला
सीमा नसेच माझ्या तृप्तीस अन् सुखाला
सांभाळला कधीचा ... पाऊस प्रेमवेडा
....रसप....
११ जून २०११
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत (भाग क्र.१५)" ह्या उपक्रमासाठी लिहिलेलं गीत.
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!