कधी वाटते की उगा बोलतो मी
मनाची कवाडे फुका खोलतो मी
नसे भावनांना इथे मोल काही
तरी ताजव्यांनी पुन्हा तोलतो मी
असे नाद धारेमध्ये पावसाच्या
ढगाला बघूनी खुळा डोलतो मी
पहा कात टाकून आलीत दु:खे
नवा घाव घेण्या जुना सोलतो मी
तुझी तू असावी असो मीच माझा
ठरे बोलुनी हे पुरा फोल तो मी
....रसप....
१२ जून २०११
आवडली! मस्तच!
ReplyDelete