दुनिया वाचुन हसली होती
कुणी 'उचलली' हळूच होती
'मेल'मधुन जी धावत होती
ती कविता तर माझी होती :-(
प्रसववेदना मीच साहिल्या
शब्दकळ्या त्या मीच फुलविल्या
पर्वा त्याची कुणास नव्हती
पण कविता तर माझी होती :-(
बिननावाची तुम्ही छापली
अगतिक पुरुषांनीहि वाचली
'नावही लिहा', तुम्हा विनंती
कारण कविता माझी होती :-(
माझी प्रतिभा माझ्यापाशी
नसेल भिडली आकाशाशी
तरी पोटची पोरच होती
ती कविता तर माझी होती :-(
तुमच्यासाठी 'स्लॉट' एकला
पेपरवरचा 'प्लॉट' रंगला
'नेटवरून साभार'च होती
पण कविता तर माझी होती :-(
'भव्य-दिव्य' नावाचा पेपर
अडलं का हो तुमचं खेटर?
गरिब कवीच्या नावापोटी
खरेच कविता माझी हो ती! :-(
....रसप....
२४ एप्रिल २०१२
एका नावाजलेल्या वृत्तपत्रात माझी कविता 'इंटरनेटवरून साभार, कवीचे नाव माहित नाही' असे लिहून छापून आली. राग नाही, रोष नाही. छापून आली, ह्याचा आनंदच. पण नाव न आल्याने जरासं दु:ख झालं. म्हणून ही जराशी गंमत..!
शेवटच कड़व खरच सुन्दर लिहिण्यात आलय. वाचताना मजा पण वाटली पाहिजे आणि कवितेतल कारुन्य स्पष्ट दिसल पाहिजे.
ReplyDeletemast kavita :)
ReplyDelete