मी जीवनास साथ देत धुंद चाललो
चिंता धुरात उडवुनी मी मुक्त चाललो
राखेस चाळणे पुन्हा असेच ना वृथा
शिशिरातुनी वसंत शोधुनी मी चाललो
जे लाभले मला मी त्यात हर्ष मानला
जे हरवले तयास विस्मरून चाललो
सुख-दु:ख हा फरकही जेथ जाणता न ये
माझ्या मनास तेथ घेउनी मी चाललो
मूळ गीत - साहीर लुधियानवी
अनुवाद - ....रसप....
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुए में उडाता चला गया
बरबादियो का सोग मनाना फजूल था
बरबादियो का जश्न मनाता चला गया
जो मिल गया उसी को मुक्कदर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलता चला गया
गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहां
मैं दिल को उस मक़ाम में लता चला गया
- साहीर लुधियानवी
रणजीत,
ReplyDeleteसरस अनुवाद केला आहेत. सुरेख.
पुढील अनुवादांकरता मनःपूर्वक शुभेच्छा!
मी केलेला खालील अनुवादही पाहा, कसा वाटतोय ते!
सोबत मी जीवनाची पुढे करीत चाललो!
सोबत मी जीवनाची, पुढे करीत चाललो
हर काळजीस धुरात, मी मिळवित चाललो
मी शोक विनाशाचा, करणे होते व्यर्थची
जल्लोष विनाशाचा, करीत व्यक्त चाललो
जे लाभले त्यालाच, मी नशीब मानले
ना लाभले, स्मृतीतुनी मी, त्यास मिटविले
सुखदुःखभेद ना मुळीच जाणवे जिथे
मी तिथे, मनास सतत, नेत चाललो
नरेंद्र गोळे २००६०७१२