'त' वरून 'ताक-भात' तू झटक्यात ओळखायचीस
वाक्य संपायच्या आधीच पूर्णविराम द्यायचीस
पण आजकाल मी नवीन नवीन भाषा शिकलोय !
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..
दोन-तीन दिवसांचा चलपट डोळ्यात तू पाहायचीस
एक क्षण बघून, माझं स्वगत तूच म्हणायचीस
पण आजकाल मी काळा चष्मा लावायला शिकलोय !
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..
'सिनेमा मला आवडला का?' तूच मला सांगायचीस
हॉटेलमध्ये माझी ऑर्डर देऊन मोकळी व्हायचीस
पण आजकाल मी आवडीही नाकारायला शिकलोय !
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..
आता तू माझ्याकडून वदवून घेऊ शकत नाहीस
माझ्या मनातलं जाणून घेऊ शकत नाहीस
तुझ्यापासूनही बरंच काही लपवायला शिकलोय..
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..
....रसप....
नमस्कार रणजित,
ReplyDeleteआपला ब्लॉग जोडण्याची नोंद २० ऑगस्ट रोजी मिळाली होती. त्यानुसार हा ब्लॉग मराठी ब्लॉग जगत्शी येथे जोडला गेलेला आहे. आपल्या ब्लॉगच्या लिंकमधे अथवा शिर्षकामधे बदल झाल्याचे मराठी ब्लॉग जगत्ला कळविण्यासाठी कृपया ’बदल’ या पर्यायामधे उपलब्ध असलेला फॉर्म भरून पाठवावा.
फेसबुकवरील मराठी ब्लॉग जगत्चे पेज लाईक करण्यासाठी येथेक्लिक करा.