कविता म्हणुनी निबंध लिहितो
भाषेचाही खून पाडतो
अश्या कवीची कीव करावी
चुकांस अपुल्या मानत नाही
शिकण्याचीही आवड नाही
अश्या कवीची कीव करावी
अर्थबोध ना काही लागे
तत्त्वशोध ना कधीच जो घे
अश्या कवीची कीव करावी
टिमटिमत्या प्रतिभेचा अपुल्या
अहंकार अन माज जयाला
अश्या कवीची कीव करावी
उस्फूर्ततेचा भास करतो
दुबळी बाजू त्यात लपवितो
अश्या कवीची कीव करावी
निंदकास जो सदा हिणवितो
स्वत:स केवळ थोर मानतो
अश्या कवीची कीव करावी
....रसप....
१४ जुलै २०११
(प्रत्येक ओळीत १६ मात्रा)
भाषेचाही खून पाडतो
अश्या कवीची कीव करावी
चुकांस अपुल्या मानत नाही
शिकण्याचीही आवड नाही
अश्या कवीची कीव करावी
अर्थबोध ना काही लागे
तत्त्वशोध ना कधीच जो घे
अश्या कवीची कीव करावी
टिमटिमत्या प्रतिभेचा अपुल्या
अहंकार अन माज जयाला
अश्या कवीची कीव करावी
उस्फूर्ततेचा भास करतो
दुबळी बाजू त्यात लपवितो
अश्या कवीची कीव करावी
निंदकास जो सदा हिणवितो
स्वत:स केवळ थोर मानतो
अश्या कवीची कीव करावी
....रसप....
१४ जुलै २०११
(प्रत्येक ओळीत १६ मात्रा)
' अशा कवीची कीव करावी..! '
ReplyDeleteकविता आवडली .
मी काही कवी म्हणवत नाही, म्हणून छान तटस्थतेने कविता वाचाण्यातील आनंद लुटता आला !
ReplyDelete