Saturday, July 09, 2011

दिंडी - २

टाळ मृदुंगाची | साथ आयुष्याची ||
तशी ह्या मनाची | विठ्ठलाशी ||


सारे वैषयिक | संसार भौतिक ||
एक असे सुख | श्रद्धा भक्ती ||


पावलोपावली | चाहूल वाढली ||
विठूची सावली | ओढ लावी ||


उभा जन्म गेला | जगूनही मेला ||
मुके दर्शनाला | विठ्ठलाच्या ||


'विठू' नाम घ्यावे | रूप न्याहाळावे ||
कृतकृत्य व्हावे | जाणीवेने ||


'जितू' म्हणे आता | विठू तूच त्राता ||
संपल्यात वाटा | वीटेपाशी ||



....रसप....
९ जुलै २०११

दिंडी - १

1 comment:

  1. तुमची हि काव्य रचना मी आंतरजालीय मराठी मासिक ढिनच्याक... एक व्यासपीठ ! मद्धे प्रकाशित करण्यासाठी निवडत आहे.
    धन्यवाद .
    मासिक खालील लिंक आणि आपल्या मेल वर मिळेल ... तुमचा मेल id फेसबुक ला मेसेज करा
    http://dhinchak.darade.com/
    आपलाच मित्र
    बाजी दराडे
    संपादक

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...