"मराठी कविता समूहा"च्या "सुरात शब्द गुंफुया (भाग - १)" साठी लिहिलेलं अंबरीश देशपांडे ह्यांच्या चालीवरील गीत..
रे मना गीत गा तू आगळे वेगळे
सुखाचा ठिकाणा रडूनी ना मिळे!
धावतो तू असा मृगजळा पाहुनी
भाळतो नेहमी गवसले हारुनी
हे तुझे दंगणे का कधी ना टळे ?
.......... रे मना गीत गा तू आगळे वेगळे
मी तुझ्या संगती भटकलो, धावलो
पाहुनी सावली थबकलो, थांबलो
थांब तूही जरा ओढतो का बळे ?
.......... रे मना गीत गा तू आगळे वेगळे
....रसप....
२७ मार्च २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!