Monday, January 07, 2013

थोडक्यात महत्वाचे !


मित्रांनो,

माझा पहिला कवितासंग्रह - 'राजहंस मी' - नुकताच, २५ डिसेंबर २०१२ रोजी औरंगाबादला प्रकाशित झाला आहे. प्रकाशक आहेत, नागपूरचे 'विजय प्रकाशन'. ह्या पुस्तकात विविध प्रकारच्या, विषयांच्या एकूण ८१ कविता आहेत. पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी ('उंच माझा झोका' फेम) श्री अरुण म्हात्रे ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.

तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशीच, १ जानेवारी २०१३ येथे, मी व माझ्या ९ कविमित्रांचा मिळून एक प्रातिनिधिक काव्य संग्रह - 'काव्य मकरंद' - सुद्धा पुण्याला प्रकाशित झाला. ह्या पुस्तकात माझ्या १० कविता समाविष्ट आहेत. प्रत्येकाच्या १०, ह्याप्रमाणे ह्या पुस्तकात एकूण १०० कविता आहेत. ह्याही पुस्तकाचे प्रकाशक विजय प्रकाशन, नागपूर हेच आहेत.

ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील पुस्तक सर्व प्रमुख शहरांतील महत्वाच्या पुस्तकालयांत उपलब्ध आहेत.

पुस्तकांच्या किंमती:

राजहंस मी = रु. १२०/-  
काव्य मकरंद = रु. १७५/- 

आपण आपली खालीलप्रमाणे माहिती मला ransap@gmail.com इथे मेल केल्यास किंवा ह्याच नोंदीवर 'प्रतिक्रिया' स्वरूपात नोंदविल्यास किंवा मला +९१ ९५५२० ०९४९९ ह्यावर संपर्क केल्यास, मी पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करू शकेन.

नाव:
पूर्ण पत्ता:
संपर्क क्रमांक:
कोणते पुस्तक?:
किती प्रती हव्या आहेत:

पोस्टाचा खर्च किती येतो ? ह्यावर मी तो सहन करू शकेन की नाही, अवलंबून असेल.. इतपत समजून घ्या मात्र !




No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...