ही रोज सावळी रात्र मला मोहवते
सागर तमसाचा पापणकाठी बनते
हातांवर माझ्या अनेकरंगी पखरण
निर्व्याजपणे ही एकच रंगी सजते
खिडकीतुन झिरपे रोज नवा अंधार
आकाश उद्याचे घरात घे आकार
पटलावर कोऱ्या मी लिहितो मन माझे
संतप्त वेदना पडते निपचित गार
दिसतात सावल्या वठलेल्या झाडांच्या
ओघळतो अश्रू गालांवर रस्त्यांच्या
मन पाचोळ्यासम इथे-तिथे भरकटते
उरतात जाणिवा चुकलेल्या ठोक्यांच्या
जो काळ हवासा वाटे, थांबत नाही
रात्रीचा अथक प्रवासी चालत राही
स्वप्नांस असावा शाप कटू सत्याचा
हे प्रकाशओझे मिळे दिशांना दाही
....रसप....
१४ जानेवारी २०१३
(संपादित - १५ एप्रिल २०१७)
सागर तमसाचा पापणकाठी बनते
हातांवर माझ्या अनेकरंगी पखरण
निर्व्याजपणे ही एकच रंगी सजते
खिडकीतुन झिरपे रोज नवा अंधार
आकाश उद्याचे घरात घे आकार
पटलावर कोऱ्या मी लिहितो मन माझे
संतप्त वेदना पडते निपचित गार
दिसतात सावल्या वठलेल्या झाडांच्या
ओघळतो अश्रू गालांवर रस्त्यांच्या
मन पाचोळ्यासम इथे-तिथे भरकटते
उरतात जाणिवा चुकलेल्या ठोक्यांच्या
जो काळ हवासा वाटे, थांबत नाही
रात्रीचा अथक प्रवासी चालत राही
स्वप्नांस असावा शाप कटू सत्याचा
हे प्रकाशओझे मिळे दिशांना दाही
....रसप....
१४ जानेवारी २०१३
(संपादित - १५ एप्रिल २०१७)
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!