आज मी खूप आत्मकेंद्रित बोलणार आहे..
पण इलाज नाही,
खरं तेच सांगणार आहे
माझ्या आयुष्यात पहिलं स्थान
नेहमी माझंच राहिलं आहे
आणि माझ्याव्यतिरिक्त सगळ्याचं
दुसरंच राहिलं आहे
कधी कुणाच्या मनामध्ये मी घर केलं होतं
कधी कुणाचं स्वप्नशिखर सर केलं होतं
ते घर, ती उंची मला आवडली
कारण तिथे मला मीच नेलं होतं
तू म्हणतेस,
स्वत:पेक्षा जास्त प्रेम केलंस.. माझ्यावर
पण मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम केलंय.. स्वत:वर !
अगदी पहिल्यापासून...
सारं काही ह्या 'मी'पासूनच सुरू झालंय
आणि तिथेच संपलंय
आईच्या पोटातून बाहेर आलो
आणि पहिला 'ट्यँहँ' केला
तो नव्हता कुणाला सुखावण्यासाठी
तो होता 'मला त्रास होतोय' हेच सांगण्यासाठी !
तुला वाईट वाटेल..
म्हणशील, "मी कोत्या मनोवृत्तीचा आहे"
पण इलाज नाही..
आज मी खरं तेच बोललो आहे..
मीच आहे माझं पहिलं प्रेम...
आणि तू.. दुसरं.......
माफ कर किंवा नको करूस....
हेच खरं आहे..
आज मी खरं तेच बोललो आहे...
....रसप....
२४ जुलै २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!