तुला कधीच जाणवलं नसेल ना
तुझं 'कविता' असणं..?
कसं जाणवणार!
शब्दाला स्वत:चं यमक कळत नसतं ,
मग कवितेला तिच्या असण्याचं गमक कसं कळणार?
म्हणून हा माझा वेडा अट्टाहास असतो..
तुझ्याशी कविता बनूनच बोलायचा
कधी तू 'वाह' म्हणतेस
कधी तू 'आह' म्हणतेस..
पण तल्लीन होऊन जेव्हा डोळे मिटतेस ना...
तेव्हा माझ्या कवितेचा परीघ बनतेस..
मी मोठा आव आणतो..
छंदमुक्त असल्याचा..
पण परिघाबाहेर पडून भरारी भरण्याचं
आजपर्यंत तरी जमलंच नाही!
तूच माझी कविता आहेस..
तुला वगळून कधी लिहिलंच नाही!
....रसप....
४ जुलै २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!