ते राजे औरच होते जे जगले लढण्यासाठी
आता खुर्च्या खुर्च्यांशी लढतात 'कमवण्या'साठी
जिकडे तिकडे ज्ञानाचा धंदा करण्याला बसले
येणार कसा विद्यार्थी प्रामाणिक शिकण्यासाठी ?
जमवून घोळके म्हणती "अवतार मीच देवाचा!"
ते भोंदू ना कामाचे धर्माला जपण्यासाठी
व्रतबंध सोहळा झाला, खुंटीस जानवे त्याचे
शहरात पुरोहित शोधे, पूजेस सांगण्यासाठी !
नुसत्याच चाचण्या करती, आजारच समजत नाही!
वैद्यांचे डॉक्टर झाले तुंबड्यांस भरण्यासाठी
वर्षानुवर्षं त्यालाही नवसांची सवयच झाली
आता ना फुरसत त्याला दु:खाला हरण्यासाठी....
....रसप....
१२ डिसेंबर २०११
एकदम झकास
ReplyDelete- अनुबंध
http://anubandhit.blogspot.com