लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत. तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या एखाद्या स्वयंसिद्ध फॉर्म्युलाला पुन्हा पुन्हा सादर करणं किंवा जुन्याच एखाद्या चित्रपटाचा पुढचा भाग बनवणं, हा चित्रपटाने निवडलेला 'शॉर्ट कट' आहे, आपल्याकडूनच शिकलेला ! एका दिवसात पटकथा आणि संवाद तयार, दोन दिवसात कास्टिंग फायनल, आठवड्याभरात लोकेशन्स, सेट्स तयार आणि २ महिन्यात चित्रपट तयार आणि एक राहिलंच अर्ध्या तासात संगीतही तयार - असे चित्रपट बनत असावेत असं काहीसं काही चित्रपट पाहिल्यावर वाटतं. पण असे चित्रपट तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवतानाही दिसतात, त्यामुळे हा 'दोष ना कुणाचा '! आपण तसे, म्हणून आपले चित्रपटही तसेच असा विचार करायचा !
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या सुप्परहिट्ट जोडीचा नव्वदच्या दशकातील सुप्परहिट्ट 'झपाटलेला'चा दुसरा भाग असाच कामचुकार गृहिणीच्या स्वयंपाकाप्रमाणे आहे.
मागील भागात दोन भुवयांच्या बरोब्बर मध्ये साध्या रिव्हॉल्वरने अचूक नेम साधून इन्स्पेक्टर महेश जाधवने भारताच्या अनेक नेमबाजपटूंना लाजवलं होतं (त्यानंतरच भारताला नेमबाजीत पदकं मिळायला लागली का ?) आणि 'तात्या विंचू'चा खातमा केला होता हे तुम्हाला लक्षात असेलच. आता हा इन्स्पेक्टर जाधव कमिशनर झाला आहे. पण अजूनही हातावर मूठ आपटून 'डॅम ईट' चालू आहे and why not ? तात्या परतला आहे ! का ? कशासाठी ? ते असो. मनुष्यदेह प्राप्त करण्यासाठी त्याला पुन्हा 'लक्ष्या'चा शोध आहे. पण लक्ष्या आता जिवंत नाही. मग ? कायद्यातील पळवाटेप्रमाणे मृत्युंजय मंत्रातही एक पळवाट आहे. 'बाप नाही, तर पोराला धर.' म्हणून हा तात्या, लक्ष्याचा पोरगा आदित्य (आदिनाथ कोठारे) च्या मागावर आहे.
पुढे काय होतं, होणार आहे ते सांगून काहीही उपयोग नाही. कारण ते इतकं बुळबुळीत आहे की सांगता सांगताही घसरायला होईल.
एकंदरीत पटकथा तर इतकी लंगडी आहे की फक्त तात्या आणि आदित्य ही दोनच पात्रंही चालली असती चित्रपटात. पण मरतुकड्या कथे-पटकथेला वजन येण्यासाठी मकरंद अनासपुरे (बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारा कलाकार म्हणून), सई ताम्हणकर (टिव्ही रिपोर्टर), सोनाली कुलकर्णी ज्यु. (तमाश्यात नाचणार्या बाईची सुशिक्षित नाचरी पोर) अश्या काही काही वजनदार नावांची स्टारकास्ट आहे. मधु कांबीकर आदित्यच्या आजीची (आधीच्या भागात लक्ष्याची आई) भूमिका करतात आणि आधी म्हटल्याप्रमाणे महेश कोठारे 'डॅम ईट' करतात. ह्या सर्वांचं अवतारकार्य ह्या दोन ओळींत जितकं लिहिलं तितकंच आहे.
ओव्हर अॅक्टिंगसाठी जर एखादा पुरस्कार असेल, तर सो. कु. ज्यु. पेक्षा आदिनाथ कोठारे आणि मधु कांबीकर त्यासाठी जास्त लायक आहेत. आदिनाथ कोठारे वडिलांकडूनही जरासा अभिनय शिकू शकतो, असं म्हणावंसं वाटतं, इतका 'होपलेस' आहे. काही फ्रेम्समधला मक्या वगळला, तर पडद्यावर अभिनय म्हणून बाकी जे काही दाखवलं आहे ते निव्वळ 'बं ड ल' आहे. कुठल्याच प्रसंगात प्रेक्षक पडद्यावरील पात्राशी नातं जोडूच शकत नाही.
अवधूत गुप्ते ह्यांचं संगीत इतरांच्या फुसक्या कामाला साजेसं आहे. शीर्षक गीताची लावणी कैच्याकै गंडली आहे. ऑक्टेव्ह्जशी खेळ करावा तर तो बाळासाहेबांनीच, हे त्या गाण्यामुळे पटतं. 'मदनिके' गाणं बरं आहे. बाकी यथा तथाच.
सपक संवाद आणि केविलवाणी विनोदनिर्मिती चित्रपटाला हास्यास्पद करतात.
अख्खा चित्रपटभर दिलीप प्रभावळकर (तात्या विंचूचा आवाज) वगळता प्रत्येक जण 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. पण आजकाल ह्यावर बोलणं म्हणजे मूर्खपणा असतो. कारण 'भावना पोहोचल्या ना? मग !' असा उलट प्रश्न होतो. आणि असंही अख्खा चित्रपट पांचटपणा आणि मूर्खपणाचा बाजार असल्यावर ह्या चुका तर अगदीच किरकोळ म्हणायला हव्या.
ह्या चित्रपटाची प्रसिद्धी 'पहिला मराठी थ्रीडी चित्रपट' म्हणून करण्यात आली, ते अगदी योग्य आहे. कारण चित्रपटाचा हा एकमेव 'यू. एस. पी.' आहे. हॅरी पॉटरचा शेवटचा भाग मी थ्रीडीत पाहिला होता. पण थ्रीडीची मजा मला तरी 'झपाटलेला - २' मध्ये जास्त आली. किमान ६-७ वेळा मी व आजूबाजूचे लोक व्यवस्थित दचकलो. अनेक कॅमेरा अँगल्स 'थ्रीडी'चा विचार करून प्रयत्नपूर्वक साधले असल्याचे जाणवते. ह्या एका गोष्टीसाठी चित्रपटकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
थोडक्यात, हा 'झपाटलेला - २' पाहाताना प्रेक्षकाचा 'झोपाळलेला' होतो पण तितक्यात थ्रीडीमध्ये काही तरी अंगावर येऊन तो दचकून जागा होतो आणि इच्छा नसताना अख्खा चित्रपट पाहावा लागतो.
रेटिंग - * (केवळ थ्रीडी साठी.)

अरे फक्त 'डॅम ईट' नाही "शिट्ट डॅम ईट"!
ReplyDelete;-) applicable review!