एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'
'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !
पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.
कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.
शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.
'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.
एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!
रेटिंग - * * १/२

मतबल
ReplyDeleteरसप बता रेला है की देखना पडेंगा ...
सोचना पडेंगा ...
मोहम्मद झीशान अयुब आहे रे त्या मुरारीचे नाव
आधी मेरे ब्रदर की दुल्हन आणि नो वन किल्ड जेसिका मध्ये दिसला होता पण मेब्रदु मध्ये बरं काम होतं याला ...
रणजित,
ReplyDeleteपिक्चर अजून पहिला नाही पण समीक्षण वाचून नक्की बघेन असे वाटतंय. तुमच्यासकट सर्व पेपरमधले पण समीक्षक एकदा बघाच म्हणतायेत. धनुष ला पाहण्याची उत्सुकता तर आधीपासूनच होती.
रजनीकांतचा जावई होण्याआधी पठ्ठ्याने २००४ मध्येच राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता म्हणे. त्यामुळे अगदीच सासऱ्याची पुण्याई खातोय असे नसावे. मागे एकदा डब तमिळ "रेडी" मध्ये पहिला होता त्याला. तेव्हा हा नक्की हिरो का शूटिंग चालू असताना चुकून फ्रेम मध्ये आलेला कोणी इसम असा प्रश्न पडला. असो, गुण असल्याशिवाय का इथपर्यंत पोहोचलाय?
परीक्षण आवडले.
सिनेमाचे समीक्षण लिहिताना अनेक जण मटा स्टाइलने लिहितात मसाले घालून त्यापैकीच हा एक. निदान दिग्दर्शक, शूट डेट,हिरो यांचा विकिपीडिया तरी वाचारे
ReplyDeleteमटा म्हणजे काय हो ?? :-/
Deleteमराठी आडनावाला कलंक आहात वाटत तुम्ही ? मटा म्हणजे महाराष्ट्र टाईम्स ! OMG चित्रपटाच्या आधी या चित्रपटाच शूट सुरु झालेलं. आणि मी या सिनेमाच्या दिग्दर्शकाला खूप जवळून ओळखते... ती व्यक्ती OMG मधील एका डायलॉग वरून... अशी जी काही ठिगळ आपण लाविलीत ती निंदनीय ! याला मसाला म्हणतात, जे "मटा",पेपरचा खप व्हाव म्हणून करत... आणि धनुष बद्दल सुद्धा अभ्यास कमीच... तुमच्या उजळ(वडिलोपार्जित पांढर्या) कान्तीत जर दम असेल तर आपणास एखाद्या करोडोतल्या कशाला, ब गटातील सिनेमातही पहायला आवडेल. तुम्हाला लिहायला आवडत तस मला वाचायला... आणि नुसत चित्रपट पाहून त्या सिनेमाच्या उत्क्रांतीबद्दल नाही बोलता येणार अस मला वाटत. तुम्हाला जर असच वाटत असेल तर यापुढे मी तुमच लिखाण वाचणार नाही... क्षमस्व !
ReplyDeleteसुरंगाजी,
DeleteOMG वाला विनोद तुम्हाला कळावा ही तुमची मानसिक व बौद्धिक पातळी नसणारच, हे तुम्ही 'मटा'सारखी फुटकळ जाहिरातपत्र वाचून वर्तमानपत्र वाचल्याच्या संभ्रमात राहता, ह्यावरून समजत आहेच. कदाचित ही उच्च अभिरुची तुम्हाला 'वडिलोपार्जित' असावी, पण मला त्याच्याशी काही एक घेणे-देणे नाही.
माझे लिखाण असेच असते. ते तुम्हाला झेपेल असं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही माझे लिखाण नाही वाचलंत तर चालेल मला !
तुम्हाला आणि आनंद राय साहेबांना मन:पूर्वक शुभेच्छा !
इथून पुढे आलेले प्रतिसाद मी काढून टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही गरळ ओकायची असेल तर ती ransap@gmail.com इथे किंवा माझा क्र. - जो माझ्या फेसबुक अकाऊण्टवर आहे - त्यावर फोन करून ओकावी.
धन्यवाद !
....रसप....
बरं झालं त्यांनी तू केलेली "ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)" ही चिरफाड नाही वाचली. जीवच गेला असता बिचाऱ्यांचा....
ReplyDeleteSo far, I have liked all your movie reviews (JTHJ one was awesome).
ReplyDeleteI have loved this Raanjhnaa movie, I could see many college 'majanu' in him. And that should only come through good acting and not through looks.
Anyway, liking a movie is very personal opinion and I respect yours. But, I have loved this movie.
Thanks !
Delete