तू माझी कविता, शब्द तुझा मी, कसे वेगळे व्हावे?
तू नदी प्रवाही, तीर तुझा मी, कुणी कुणाचे व्हावे ?
तू व्याकुळ नजरा, तुलाच मी पापणीत जपले होते
तू कातरवेळी पाझरताना सुगंध उरले होते
तू लोचनातला पारा तुजला कुणा दावले नव्हते
तू अथांग सागर मनातला पण तरंग उठले नव्हते
तू देवळातली देवी जी व्यापून दिशांना उरली
जी सुभाषितांचे तेज लेउनी आकाशाला स्फुरली
तू स्पंदन माझे, तू श्वासांचा ताल बांधला होता
तू प्राणाच्या ज्योतीस अनोखा उजेड दिधला होता
तू सुरात माझ्या तुझ्याविना मी गीत कोणते गावे ?
तू हळवी फुंकर वेणूमधली तुझ्यात हरवुन जावे..
....रसप....
२५ जानेवारी २०१२
ए... खूप छान आहे ही कविता...
ReplyDelete"तू सुरात माझ्या तुझ्याविना मी गीत कोणते गावे ?
तू हळवी फुंकर वेणूमधली तुझ्यात हरवुन जावे.."
एकदम खास
-रश्मी
Thank u..!! :-)
ReplyDeleteek ek dweepadi khup allad taral utarali aahe ....
ReplyDeletehalavi halavi hot hot sanj jashi ratreet utarat jate tashee vatalee ......
mast,....