Saturday, March 27, 2010

निरोप.

तू प्रश्न करणार नाहीस
मला माहीत होतं
उत्तर माझ्या डोळ्यांमधून
कधीच लपलं नव्हतं

उधारीचं आयुष्य आहे,
माझा अधिकार नाही
दबून गेलोय ओझ्यांखाली,
माझा प्रतिकार नाही

सारंच मला हवं ते
सहज मिळणार असतं;
जीवनासारखं स्वप्न मी
दुसरं पाहिलंच नसतं!

तुझा निरोप घेताना
डोळ्यात पाणी नव्हतं
नातं जोडून तोडताना
काहीच गमावलं नव्हतं

हिशोब केला दु:खाचा,
जेमतेम टिचभर होतं
तू दिलेलं प्रेम मात्र,
सागरा एव्हढं होतं

आज तुझा स्पर्श होतां
काळीज कापलं होतं
ओठी ओघळलेलं प्रेम
निरोपाचं होतं.


….रसप….
आर.PAR
२७ मार्च २०१०

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...