भाग पूर्ण - बाकी शून्य, सरळसरळ गणित
आयुष्याची गोळाबेरीज काहीच नव्हतं फलित
वाट चालता जिथे चालली तसातसा मी गेलो
साथ लाभता जशी मिळाली प्रत्येक वेळी रमलो
कुठे चाललो, काय साधले; कुणास होते माहीत
....... आयुष्याची गोळाबेरीज काहीच नव्हतं फलित
कधी ऐकता उदोउदो मी झाडावरती चढलो
वाळून गेल्या पानासारखा अलगद खाली पडलो
वा-यासंगे होणार होती, फरफटसुद्धा झालीच
....... आयुष्याची गोळाबेरीज काहीच नव्हतं फलित
झोकून देऊन प्रेम केलं, सारं काही ओतलं
सारं काही मला मिळालं, प्रेम तेव्हढं राहिलं
झुरलो नाही, कुढलो नाही, शिकलो नाही काहीच
....... आयुष्याची गोळाबेरीज काहीच नव्हतं फलित
दु:खाला मी खोदून खोदून खोल गाडून टाकलं
आनंदाला बाजाराला नेऊन नेऊन विकलं
आज उभा मी विकण्यासाठी, ग्राहक नाही कुणीच..
....... आयुष्याची गोळाबेरीज काहीच नव्हतं फलित
....रसप....
२० एप्रिल २०१०

No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!