-- चल शांततेत ऐकू मधुबोल आठवांचा
सरले कुरूप सारे दिसरात वेदनांचे --
.
.
हळूवारशा क्षणांना ओढून घेत जावे
श्वासात श्वास दोन्ही मिसळून एक व्हावे
बाहूंत तू विरावे दुग्धात शर्करा ती
ओठांस प्रश्न व्हावा, "मी का मधूर व्हावे?"
आता नकोस बोलू मी ऐकणार नाही
तू गोड लाजताना डोळे मिटून घ्यावे
धुंदी कुणा कळावी बेताल जाहल्यांची
बेधुंद होऊनीही तालात गीत गावे
....रसप....
(आर.PAR)
९ मार्च २०१०
सरले कुरूप सारे दिसरात वेदनांचे --
.
.
हळूवारशा क्षणांना ओढून घेत जावे
श्वासात श्वास दोन्ही मिसळून एक व्हावे
बाहूंत तू विरावे दुग्धात शर्करा ती
ओठांस प्रश्न व्हावा, "मी का मधूर व्हावे?"
आता नकोस बोलू मी ऐकणार नाही
तू गोड लाजताना डोळे मिटून घ्यावे
धुंदी कुणा कळावी बेताल जाहल्यांची
बेधुंद होऊनीही तालात गीत गावे
....रसप....
(आर.PAR)
९ मार्च २०१०
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!