Thursday, January 15, 2009

भाऊ, ताण नको घेऊ


भाऊ, ताण नको घेऊ;
सोड चिंता कामाची, साडे-सातला जाऊ..!

कामाला "नाही" नाहीच कधी म्हणायचं
अरे, बॉसला नकार देणं कसल्या उपयोगाचं?
कारण एखादं काम नाकारणं
म्हणजे नंतर तेच जबरदस्तीने करणं!
म्हणूनच बरं असतं आधीच "हो" म्हणणं..
"हो" म्हणायचं आणि
आपलंच गाडं रेटत राहायचं
"मार धक्का बोलेश्वर" म्हणायचं

एकदा पाणी डोक्यावर गेलं
की काय फरक पडतो
दोन फूट गेलं की वीस फूट गेलं
ओतेनात का बापडे अजून चार-दोन बादल्या
बिनधास्त डूंबायचं

भाऊ, ताण नको घेऊ
प्रेशर कुकर बनायचं
वाढलेलं प्रेशर दाबून नाही ठेवायचं
शिट्टी मारून मोकळं व्हायचं
अगदीच आल्या डोक्याला मुंग्या
तर एकच सांगतो
डोक्यावरती हात अन् टेबलाखाली पाय..
एकशे अंशी अंशात यायचं
डोळे मिटून "खड्ड्यात गेली कंपनी" म्हणायचं..

भाऊ, प्रेशर कुकर बनायचं
एक्स्टर्नल प्रेशर मुळे इंटर्नल प्रेशर नाही वाढवायचं..


....रसप....
१५ जानेवारी २००८

1 comment:

  1. अरे वा !! रणजीत...
    अर्ध्या जानेवारीतच ९..जोरात चाललंय..
    या वर्षाच्या सूरूवातीला काही विशेष प्यायला होतास का?? [:P] नाही म्हणजे..बुद्धीवर्धक काही म्हणतेय हो.. !!

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...