Sunday, January 04, 2009

पुन्हा एकदा..


बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा
पुन्हा एक चेहरा खुणावतोय

डोळे मिटले की
पापण्यांमध्ये लपतोय
डोळे उघडले की
नजरेसमोर तरळतोय..
हसरा, लाजरा, साजिरा
मूकपणे बोलणारा...
.. हरवून टाकणारा

सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ डोळे
त्यावर लपलपणाऱ्या पापण्या
गुलाबाच्या पाकळ्याच..
बाकी काहीच नाही
मी इतकंच पाहिलं.. 
मला इतकंच दिसलं..
इतकंच पुरलं.. पुरून उरलं..!!

पुन्हा एकदा..
काळजाचा ठेका काही मात्रा थांबलाच
आणि नंतर लागली लग्गी
दिडपट की दुप्पट..
तालात आहे की नाही..
माहीत नाही
पण मी मुग्ध आहे
मी धुंद आहे.. पुन्हा एकदा.

पुन्हा एकदा साचलेल्या डोहाला
वाट मिळाली आहे..
वाहायला, खळखळायला
.. मनसोक्त नाचायला
आता मी वाहणारच,
प्रश्न इतकाच..
असाच वाहाणार की पुन्हा एकदा..
साचणार..
आटणार..
शेवाळणार..
हिरवटणार.
बघू या..!!

एक मात्र नक्की.
माझी जागा बदलणार
अन् मागे एक खळगा राहणार..
.. इथे मी साचलो होतो....


....रसप....
०३ डिसेंबर २००८

1 comment:

  1. [:)]
    सूंदर कविता आणि त्या मागची भावना !!
    प्रेम म्हणजे motivation !!
    मग ते जिंकण्यासाठी असो, जगण्यासाठी असो किंवा वाहण्यासाठी असो.. i really cherish this pure feeling..good.. !!

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...