ती अजून आठवते
मन माझ्याशी हरते
निर्माल्य आठवांचे
गहिवरते, मोहरते
मी खिडकीचा पक्षी
डोकावुन जाणारा
हलकेच आर्ततेला
हिंदोळा देणारा
डोहात तरंगांचे
अस्तित्व कुणा स्मरते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
संध्येच्या पटलावर
अश्रूंचा ओलावा
जो माझ्यातुन गेला
तो कुणास लाभावा ?
मी साद तिला देतो
झाडांतुन सळसळते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
काळोखी दु:खाला
आवाज शांततेचा
जपलेल्या जखमेशी
संवाद वेदनेचा
ओठांवर जे येते
डोळ्यांतुन ओघळते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
किरणांच्या होडीवर
दिवसाचे वाहवणे
भवताली शून्याने
नववर्तुळ आवळणे
मिटताना डोळ्यांनी
उमलावे ओझरते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
....रसप....
२६ मार्च २०१४
मन माझ्याशी हरते
निर्माल्य आठवांचे
गहिवरते, मोहरते
मी खिडकीचा पक्षी
डोकावुन जाणारा
हलकेच आर्ततेला
हिंदोळा देणारा
डोहात तरंगांचे
अस्तित्व कुणा स्मरते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
संध्येच्या पटलावर
अश्रूंचा ओलावा
जो माझ्यातुन गेला
तो कुणास लाभावा ?
मी साद तिला देतो
झाडांतुन सळसळते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
काळोखी दु:खाला
आवाज शांततेचा
जपलेल्या जखमेशी
संवाद वेदनेचा
ओठांवर जे येते
डोळ्यांतुन ओघळते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
किरणांच्या होडीवर
दिवसाचे वाहवणे
भवताली शून्याने
नववर्तुळ आवळणे
मिटताना डोळ्यांनी
उमलावे ओझरते
ती अजून आठवते, ती अजून आठवते
....रसप....
२६ मार्च २०१४
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!