राहुनी गेली जगायाचीच माझी भूमिका
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका
बोलक्या डोळ्यांत होती मूक वेडी आसवे
चंद्र तो ओथंबलेला साचलेल्या चंद्रिका
व्यक्त झालो मी तरी अव्यक्त काही वाटते
घ्या लिहा पुढचे तुम्ही अन् भावना माझ्या विका !
हार मी मानीन ऐसा काळही बनलाच ना
क्रुद्ध होऊनी फुलविता व्यर्थ का हो नासिका?
ठेच तुजला लागता जे हासले होते 'जितू'
पाहुनी शिकले तुला ते बोलती मजला "शिका"!
....रसप....
४ सप्टेंबर २०११
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका
मोजक्या श्वासांत मोजावे किती कोणी कसे?
राहिली कोरीच पाटी अन् गुणांची तालिका बोलक्या डोळ्यांत होती मूक वेडी आसवे
चंद्र तो ओथंबलेला साचलेल्या चंद्रिका
व्यक्त झालो मी तरी अव्यक्त काही वाटते
घ्या लिहा पुढचे तुम्ही अन् भावना माझ्या विका !
हार मी मानीन ऐसा काळही बनलाच ना
क्रुद्ध होऊनी फुलविता व्यर्थ का हो नासिका?
ठेच तुजला लागता जे हासले होते 'जितू'
पाहुनी शिकले तुला ते बोलती मजला "शिका"!
....रसप....
४ सप्टेंबर २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!