Sunday, September 28, 2008

थेंबभर जमीन....

थेंबभर जमीन
इंचभर हवा
कणभर पाण्यावर
मला हक्क हवा

तो गंध पाहिलेला
आवाज शोषलेला
चेहरा ऐकलेला
माझ्यासमोर असावा

पाउस वाहलेला
मृदगंध बरसलेला
दरवळुन चंद्र माझ्या-
-सोबती असावा

क्षण एक थांबलेला
अंधार उजळलेला
मी धुंद जाहलेला
एकदा तरी असावा



....रसप....
२८ सप्टेंबर २००८ 

1 comment:

  1. पहिलं कडवं छान वाटलं. त्यातीलही
    " थेंबभर जमीन
    इंचभर हवा " हि मोजमापं भावली नाहीत. पण तरीही आख्खी पोस्ट वाचावीशी वाटली. पण पुढे आणखीनच भ्रमनिरास झाला.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...