Sunday, December 08, 2013

पुस्तक

एक पुस्तक लिहावं, असा विचार करतो आहे

नाव 'तू'
हक्क तुझे
प्रस्तावना तुझी
मुखपृष्ठ तू
मलपृष्ठही तूच
आतला शब्दन् शब्द तुझाच
फक्त मनोगत माझं....

हे पुस्तक जगासाठी नसेल
फक्त आपल्यासाठी असेल
कारण खूप काही अव्यक्त राहिलंय
कारण खूप काही अव्यक्तच राहणार आहे

एक पुस्तक लिहिणार आहे
आठवांच्या पानांवर, आसवांच्या शाईने..

....रसप....
७ डिसेंबर २०१३

3 comments:

  1. तुमची कविता चोरी केली गेली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. फेकबुक वर ती स्वतःच्या नावाने पोस्ट केली आहे एका व्यक्तीने

      Delete
    2. फेकबुक वर ती स्वतःच्या नावाने पोस्ट केली आहे एका व्यक्तीने

      Delete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...