रक्त मराठी जपणा-याला आता वाली कोण?
"मी मुंबैकर" आवाजाला आता वाली कोण?
एका झेंड्याखाली जमता लाखोंचा समुदाय
थरथरणा-या व्यासपिठाला आता वाली कोण?
कुठल्या अंगुलिनिर्देशाची समजुन घ्यावी दिशा?
गोंधळलेल्या सैन्यदलाला आता वाली कोण?
कोल्हे, बिबटे आणि लांडगे अवतीभवती इथे
वाघानंतरच्या रानाला आता वाली कोण?
आता त्यांचे सिंहासन ते असेच राहिल रिते
माळेमधल्या रुद्राक्षाला आता वाली कोण?
....रसप....
२० नोव्हेंबर २०१२
माळेमधल्या रुद्राक्षाला आता वाली कोण
ReplyDeleteसही...