Thursday, December 30, 2010

बात निकलेगी तो फिर..........

प्रेरणा: "बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी" (कफील आजेर)


कोणी काही विचारलं तर माझं नाव घेऊ नकोस
मनामध्येच ठेव सारं, ओठांवरती आणू नकोस

खोडच असते लोकांना उगाच नाक खुपसायची
गप्प राहण्याचं कारणसुद्धा कुणालाही सांगू नकोस

तुझ्या रेशमी केसांत माझे श्वास असतील रेंगाळत
मोकळं कर त्यांना पण केस मोकळे सोडू नकोस

प्रश्न करतील काही-बाही हातांकडे पाहून तुझ्या
वाढलेल्या बांगड्यांचा तू हिशोब कधी देऊ नकोस

भोचक-खडूस टोमणे तुला काट्यांसारखे खुपतील
पिउन घे आसवांना डोळ्यांमध्ये साठवू नकोस

उलट-सुलट प्रश्नांना तर पेवच फुटेल बघ आता
प्रतिप्रश्न करून तिथे विषयाला वाढवू नकोस

खरी गोष्ट बाहेर आली तर काहूर माजेल चोहिकडे
मनामध्येच ठेव सारं, ओठांवरती आणू नकोस



....रसप....
३० डिसेंबर २०१०

Friday, December 17, 2010

तू मैफलीत का बोलाविले मला..

माझा प्रवास ही अर्धाच राहिला
पेल्यात जाम ही अर्धाच राहिला

जो घोट घेतला नादात झिंगलो
धुंदीत भोगही अर्धाच राहिला

तो रोज़ शायरी मी गायलो अशी
शब्दांत शब्दही अर्धाच राहिला

वाटे मला न का अपमान कोणता
सन्मान ही मनी अर्धाच राहिला?

बोलू नकोस तू की प्रेम तोकडे
हृदयात श्वास ही अर्धाच राहिला

संताप प्यायलो कंठास जाळले
आवेश अंतरी अर्धाच राहिला

तू मैफलीत का बोलाविले मला
अंतास प्राण ही अर्धाच राहिला


....रसप....
१६ डिसेंबर २०१०

Monday, December 13, 2010

मौत तू एक कविता हैं.. (भावानुवाद)

काळ नावाची एक कविता आहे
एका कवितेचा माझ्याशी वायदा आहे..
सृजनाला चौकट देण्याचा..

अडखळत्या ठोक्यांच्या नादात
जेव्हा वेदना विरू लागेल
ओशाळल्या चेह-याने चंद्र क्षितिजावर रेंगाळेल
उगवता दिवस अन मावळती रात
घुटमळतील उगाच एकमेकांना पाहात
कणभर अंधार की कणभर प्रकाश?
उजेड-काळोखाच्या अस्तित्त्वांचा आभास..
अन अशातच सुरू होइल
शून्यातून अथांगतेकडचा प्रवास......

....एका कवितेचा माझ्याशी वायदा आहे..
सृजनाला चौकट देण्याचा....



....रसप....
१० डिसेंबर २०१०



मूळ कविता:

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है
मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
...जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ

मुझसे एक कविता का वादा है
मिलेगी मुझको

-गुलज़ार
Related Posts Plugin for WordPress, Blogger...