आकाश वितळुन जातां क्षितिजावर थिजले होते
धरतीचे गोठून जाणे कुणा ना दिसले होते
ओतून चांदणे सारे कमजोर जाहला होता
आधार चंद्रीकांनी चंद्राला दिधले होते
जन्मून पर्वतराशीं सागरा शोधत होती
सावरण्या सरितेला निशब्द किनारे होते
गुंतून अहंकारी मी माझाच राहिलो होतो
निष्ठुर वार तू माझे हासून झेलले होते....
....रसप....
१० ऑक्टोबर २००८
धरतीचे गोठून जाणे कुणा ना दिसले होते
ओतून चांदणे सारे कमजोर जाहला होता
आधार चंद्रीकांनी चंद्राला दिधले होते
जन्मून पर्वतराशीं सागरा शोधत होती
सावरण्या सरितेला निशब्द किनारे होते
गुंतून अहंकारी मी माझाच राहिलो होतो
निष्ठुर वार तू माझे हासून झेलले होते....
....रसप....
१० ऑक्टोबर २००८
donda vachavi mhanun donda post keli ki kay??
ReplyDeletemala vatatey chukun jhaley !!
ekeek sher mast aahe !!
sahi.....majhee vachyachi rahili hoti bahuda ....
ReplyDeleteshevata sher jabaree aahe .....ant bhala to sab bhala :-)