चित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही !
माझ्या शब्दखुणा
- कविता (371)
- गझल (156)
- चित्रपट परीक्षण (152)
- मुक्तछंद (125)
- कविता - मात्रा वृत्त (108)
- गझल - गण वृत्त (96)
- लयबद्ध (64)
- कविता - गण वृत्त (59)
- गझल - मात्रा वृत्त (57)
- मुक्त कविता (49)
- भावानुवाद - कविता (42)
- ललित (30)
- विनोदी कविता (27)
- क्रिकेट (17)
- गीत (17)
- अक्षर छंद (16)
- व्यक्तिचित्रणपर कविता (12)
- सुनीत (4)
- हिंदी कविता (3)
Wednesday, October 29, 2008
Saturday, October 11, 2008
जाळुन अहंकाराला....
तोडून टाकले मी ते बंध भावनांचे
डोळ्यांत मोतियांचे सर सांडले तू होते
जाणीव जाहली जी निरपेक्ष तुझ्या प्रेमाची
परतीचे रस्ते सारे लाथाडत मजला होते
केलेल्या पापांना मी चूकभूल जाणत होतो
तू माझ्या पापांनाही भोगून फेडले होते
जाळुन अहंकाराला भेटाया आलो तुजला
शेवटचे माझ्यासाठी तू श्वास राखले होते....
....रसप....
११ ऑक्टोबर २००८
डोळ्यांत मोतियांचे सर सांडले तू होते
जाणीव जाहली जी निरपेक्ष तुझ्या प्रेमाची
परतीचे रस्ते सारे लाथाडत मजला होते
केलेल्या पापांना मी चूकभूल जाणत होतो
तू माझ्या पापांनाही भोगून फेडले होते
जाळुन अहंकाराला भेटाया आलो तुजला
शेवटचे माझ्यासाठी तू श्वास राखले होते....
....रसप....
११ ऑक्टोबर २००८
Friday, October 10, 2008
गुंतून अहंकारी....
आकाश वितळुन जातां क्षितिजावर थिजले होते
धरतीचे गोठून जाणे कुणा ना दिसले होते
ओतून चांदणे सारे कमजोर जाहला होता
आधार चंद्रीकांनी चंद्राला दिधले होते
जन्मून पर्वतराशीं सागरा शोधत होती
सावरण्या सरितेला निशब्द किनारे होते
गुंतून अहंकारी मी माझाच राहिलो होतो
निष्ठुर वार तू माझे हासून झेलले होते....
....रसप....
१० ऑक्टोबर २००८
धरतीचे गोठून जाणे कुणा ना दिसले होते
ओतून चांदणे सारे कमजोर जाहला होता
आधार चंद्रीकांनी चंद्राला दिधले होते
जन्मून पर्वतराशीं सागरा शोधत होती
सावरण्या सरितेला निशब्द किनारे होते
गुंतून अहंकारी मी माझाच राहिलो होतो
निष्ठुर वार तू माझे हासून झेलले होते....
....रसप....
१० ऑक्टोबर २००८
Saturday, October 04, 2008
स्वर्गसुख भोगीता....
मिठीत माझ्या मिठी घेऊनी विरघळुन गेलीस
दुग्ध-शर्करा शरीर माझे रुधिरातुनी भिनलीस
अजून माझ्या श्वासांमधुनी श्वास तुझा दरवळतो
स्पर्श हवेचा कोमल मजला केस तुझे भासतो
क्षणैक वाटे मनात मजला कुबेर मी बनलो का..?
असेल कुठले मौलिक रत्न तुझ्यापरि दुसरे का..?
आज भोगिले स्वर्गसुख मी धन्य धन्य पावलो
तव ओठिचे अमृत प्राशून अजरामर जाहलो
....रसप....
०४ ऑक्टोबर २००८
दुग्ध-शर्करा शरीर माझे रुधिरातुनी भिनलीस
अजून माझ्या श्वासांमधुनी श्वास तुझा दरवळतो
स्पर्श हवेचा कोमल मजला केस तुझे भासतो
क्षणैक वाटे मनात मजला कुबेर मी बनलो का..?
असेल कुठले मौलिक रत्न तुझ्यापरि दुसरे का..?
आज भोगिले स्वर्गसुख मी धन्य धन्य पावलो
तव ओठिचे अमृत प्राशून अजरामर जाहलो
....रसप....
०४ ऑक्टोबर २००८
Subscribe to:
Posts (Atom)