दु:ख व्हावे लुप्त तैसा भास होऊ दे
मैत्रभावे जीवना तू आज गाऊ दे
वाट माझी तापलेली थंड सावली
पोळलेल्या पावलांनी ताल देउ दे
घे उशाशी अंध आशा नीज येतसे
एकदा घटकाभरी तू श्वास घेऊ दे
मी प्रवासी दक्षिणेला संथ चाललो
गुप्त माझ्या ऒळखीला शब्द देऊ दे
....रसप....
२८ सप्टेंबर २०१०
मैत्रभावे जीवना तू आज गाऊ दे
वाट माझी तापलेली थंड सावली
पोळलेल्या पावलांनी ताल देउ दे
घे उशाशी अंध आशा नीज येतसे
एकदा घटकाभरी तू श्वास घेऊ दे
मी प्रवासी दक्षिणेला संथ चाललो
गुप्त माझ्या ऒळखीला शब्द देऊ दे
....रसप....
२८ सप्टेंबर २०१०