Monday, December 15, 2008

जाग


बेधुंद होऊनी जे चालून चाल गेले
आई तुझ्या मुलांनी मृत्युस हासविले

त्या क्रूर श्वापदांचा हैदोस शांत केला
हातांस ओढूनी त्यां नरकात पोचविले

शूरांस वंदितो मी जोडून हात दोन्ही
मेले जरी तरीही राष्ट्रास जागविले

ही जाग येथ राहो, वाती मशाल होवो
अमुच्याच साहण्याने शत्रूस माजविले..


....रसप....
१५ डिसेंबर २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...